कविता : मनातले पानावर

कविता : मनातले पानावर

 दि  15।9।200।

मनातले पानावर


मनाच्या कंपनातुन आनेक लहरींचा उगम होतो. पण शेवट मात्र नसतो.
आज देखील आनेक बधंनाचा विळख्यात सापडलेल्या आजच्या स्रिया .स्वतंत्र आहेत का? 
 खरच खुप काही सोसले आम्ही व सोशीतच आहोत.
स्वातंत्र मिळाले. राज्यघटनेत सर्व काही लिहिले गेले पण तसे वागता का?    

 आनेक बंधनातुन लादले गेलेलो आम्ही.
आई वडिल नवरा मुल......दडपण दडपण  दम छाक झाली.
विचार आमच्या भावना खुप  चुरगळला गेल्या. मोकळा श्वास नाही.
छंद जोपासण्यासाठी वेळ नाही ते पण घरातली व्यक्तीच्या मनावर अवलंबुन आसते. 

 पुरुषांना अनेक चुका माफ मग आम्हालाच का माफ नाही.
का? आमच्या विचारांना महत्व नाही.
खर तर आम्हाला इतर वैभवा पेक्षा मानसिक सुखाची जास्त गरज आसते.
आणि खर तर तोच पाया मजबूत डगमगलेला आसतो.
खुप काही सोसावे लागते. जिवन निरर्थक वादांमध्ये जगावे लागते.


0 Comments: