सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
डोंबिवली ( शंकर जाधव ) गणेशोत्सवानिमित् दानशूर व्यक्तिमत्व मनसे डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे आणि मैत्री कल्याणकारी संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या `सेल्फी विथ बाप्पा`स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथमेश शर्मा, दुसरा क्रमांक जितेंद्र अमोणकर, तृतीय क्रमांक मनोज जोशी आणि उत्तेजनार्थ म्हणून मयंक वीसरिया, स्नेहल कांबळे, विशाल मसुरकर, आशा गायकवाड, रेशम वाकचौरे, प्रणय विधाते आणि श्रीधर सुर्वे, या विजेत्यांना स्पर्धकांना मनसे डोंबीवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात कोरयोग्राफर महेश दवंडे यांनी केले. यावेळी स्पर्धेचे आयोजक कविता देशंपाडे, अॅड.प्रदीप बावस्कर, हिम्मत म्हात्रे उपस्थित होते.विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देताना म्हात्रे यांनी उपस्थितांना आध्यात्मिकातून मार्गदर्शन केले. यावेळी निवेदन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी प्रवीण गायकवाड यांनी केले.





0 Comments: