|| झाले असेल तर ||
झाले असेल तुमचे मिडीयावाले
जर सुशांत, रिया,कंगनाचे प्रकरण
तर इकडेही जरा लक्ष द्या...||
दाखवाना तुमच्या स्क्रीनवर गरिबांच्या व्यथा
कोरोना महामारीने झालेत जे बेरोजगार
मिळेल का हो तुमच्यामुळे त्यांना रोजगार...||
शेतकरीही झालायं बघा ना किती बेहाल
उचलेना झालेत व्यापारी त्यांचा शेतमाल
बियाणे हि आता डुप्लिकेट मिळतात
कसे हे व्यापारी त्यांचे पैसे उकळतात...||
आॅन लाईनने म्हणे शिक्षण आता मिळणार
गरीबांच्या मुलांना सांगा ना ते कसे कळणार वणवण दिवसभर भटकावे लागते पोटासाठी
होईल का ऐपत त्यांना अॅण्ड्राॅइड फोन घेण्यासाठी...||
पैशेवाल्यांच्यासाठी आहे का सूरू तुमचे चॅनल
त्यांचेच कौतुक कसे करते हो तुमचे हे चॅनल
आहेत किती तरी उग्र प्रश्र्न देशांमध्ये
कधी तरी करा त्यांनाही कव्हर तुमच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये...||
रचनाकार ©️ कवी-दीप.
कल्याण प.जिल्हा ठाणे.
महाराष्ट्र राज्य.




0 Comments: