लोकल सुरु करण्यासाठी डोंबिवलीत मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) ब्रिटीशांची राजसत्ता उलथवून टाकयासाठी सविनय कायदेभंगाची चळवळीने महात्मा गांधी यांनी सर्व देश ढवळून काढला होता.आज मनसेचे गांधीच्या या मार्गावर चालत महाविकासआघाडी सरकारविरोधात हल्ला बोल केला.सर्व सामान्य चाकरमानी प्रवाश्यांना लोकल ट्रेनची सुविधा मिळावी यासाठी मनसेने महाविकास आघाडी सरकार विरोधात डोंबिवली स्टेशनबाहेर सविनय कायदेभंग आंदोलन केले.मात्र पोलिसांनी दडपशाहीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.परंतु मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्याना न जुमानता स्टेशनबाहेर आंदोलन सुरूच ठेवले. पोलिसांनी मनसेच्या ६ महिला पदाधिकारी आणि २५ मनसैनिकांना ताब्यात घेऊन दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च पासून लोकल ट्रेन बंद केल्या होत्या. त्यानंतर चार-पाच महिन्यानंतर सरकारने सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि पालिका कर्मचारी यांना लोकल सेवेने प्रवास करण्यास परवानगी दिली. मात्र सर्व सामान्य जनतेला लोकल सेवा उपलब्ध नसल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरसच्या माध्यमातून मुंबई लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र कोरोना संसर्ग वाढण्याची जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला त्याबाबत परवानगी दिली नाही. सात महिने होऊन गेल्यावर सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी लोकल सेवा सुरु नसल्याने नागरीक प्रचंड संतापले आहेत. जनतेचे होत असलेले हाल पाहत मनसेने मुंबई लोकल सुरु करा अशी मागणी केली.सोमवारी सकाळी डोंबिवलीत मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन केले.या आंदोलनात मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम,जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर, प्रल्हाद म्हात्रे, दीपिका पेडणेकर,राहुल कामत,सागर जेधे,विजय शिंदे, सुमेधा थत्ते,गणेश कदम,हरीश पाटील,संदीप ( रमा ) म्हात्रे,ओम लोके,शर्मिला लोंढे,सुहास काळे,संकेत तांबे, केतन सावंत,स्वप्नील वाणी, श्रीकांत वारंगे,कदम भोईर,राजेश दातखीळे, प्रदीप रोखडे, हर्षद देशमुख,राजू दिवेकर,विशाल बडे आदीसह अनेक पदाधिकारी आणि कायकर्ते सहभागी झाले होते.`आघाडी सरकार घरी बसून सांगतय माझ कुटुंब माझी जबाबदारी.. आम्ही सांगतोय बस पेक्षा लोकल बरी`,महाविकास आघाडीला लोकल सुरु करावीच लागेल अश्या प्रकारच्या घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी दिल्या यावेळी उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले,आज जे चाकरमानी डोंबिवलीतून बसने चार-पाच तास प्रवास करत आहे त्यांच्यासाठी तरी लोकलसेवा सुरु करा. त्यामुळे गर्दी कमी होईल.इतके तास प्रवास करून लोक थकल्यावर त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होईल मग ते त्यांचे शरीर कोरोनाशी कसे सामना करणार ? राज्य सरकारने याचा विचार करून त्यासाठी ठोस पाउले उचलली पाहिजेत.




0 Comments: