लोकापर्णाची वाट न पाहता डोबिवलीतील रेल्वे पादचारी पुल सुरु..
 |
डोबिवलीतील रेल्वे पादचारी |
डोंबिवली ( शंकर जाधव ) ४० वर्ष जूना असलेला डोंबिवली पूर्वेकडील कल्याण दिशेकडील रेल्वे पादचारी पूल कमकुवत झाला होता.रेल्वे प्रशासनाने सदर पुल नव्याने तयार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बंद केला होता.त्यामुळे प्रवाश्यांनी मधल्या पुलाचा वापर केल्याने पुलावर प्रचंड गर्दी होत होती.कोरिनाच्या काळात या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. नागरिकांचा त्रास लक्षात घेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सदर पुलाच्या कामाची पाहणी केली.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने 22 मार्च पासून रेल्वे सेवा बंद केली होती.त्यामुळे रेल्वेच्या पुलाच्या कामाला अधिकच गती मिळाली.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या पुलाचे काम 99 टक्के काम पूर्ण झाले आहे.त्यामुळे आता नागरिकांनी या पुलाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.१५ ऑगस्ट रोजी सदर पूल रहदारीसाठी खुले होणार अशी चर्चा सूरु होती.आता राजकीय पक्षांकडून सदर पुलाच्या लोकापर्णची वाट न पाहता सूरु झालेल्या या पुलावर सध्या नागरिकांची अद्याप गर्दी होत नसली तरी काही दिवसांनी पुलावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
0 Comments: