श्री प्रकाश भोईर यांनी विभागात केली औषध फवारणी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका वार्ड क्र 56 चे नगरसेवक व मनसे जिल्हाद्यक्ष, विरोधी पक्षनेता श्री प्रकाश भोईर यांनी आज उमेशनगर विभागात भेट दिली, शनिवार पासून घटस्थापना असल्याने नवरात्रोत्सव असणार आहे, तेव्हा तेथे प्रकाश भोईर उमेशनगर , देवीचापाडा येथे यंगस्टार मैदानांत आले होते. येथे पाहणी करून आपल्या स्वतःच्या हस्ते तेथील वातावरण जंतू विरहित होऊन स्वच्छ राहावे याकरिता त्यांच्या टीमने परिसरात स्वच्छता रहावी या साठी काम हाती घेतले होते, त्यावेळी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी स्वतः दुर्गादेवी मंडपाच्या ठिकाणी औषध फवारणी केली व तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी विभागात डास आणि मच्छरचा नायनाट होण्याकरिता धूर फवारणी केली





0 Comments: