डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
शिर्षक-भारत मातेचा सुपूत्र
विज्ञानाचा परमभोक्ता
ए.पी.जे.अब्दुल कलाम,
मनाने साधा, शिघ्रकवी
त्यांच्या जिद्दीस सलाम. ॥१॥
१५ october १९३१ रोजी
रामेश्वरीत पुत्र रत्न जन्मले,
ए. पी .जे.अब्दुल कलाम
सारे त्रिभुवन दुमदुमले.॥२॥
बालपणी जोपासले त्यांनी छंद
रूद्र वीणा वाजविण्यात असे दंग,
रंग चढ़े मुलांच्या गप्पा गोष्टीत
अखंड विद्या साधनेत ते दंग ॥३॥
वर्तमानपत्रे विकून करी घराचा गूजारा
हरविले होते बालपणी वडिलांचं छत्र ,
परीस्थिती पुढे नाही झुकली स्वारी
घेईन उंच भरारी,जिद्द खास मात्र.॥४
बहिण भावाचे प्रेम जिवापाड,
बहिणीचे ठेवूनी दागदागीने गहाण,
राष्ट्रपती पद भुषविण्या केली धडपड
शिक्षण घेण्या केले जीवाचे रान.॥५॥
भारताच्या अग्नी प्रक्षेपणास्त्रांची केली निर्मीती
१९९७ साल उजाडताच सन्मानित केले,
पद्मभूषण,पद्मविभुषण अन भारतरत्न पुरस्कारांनी
अजरामर त्यांच्या कार्यांनीच झाले. ॥६॥
अविवाहित राहून केली देशसेवा
नाही केला कधी त्यांनी मांसाहाराचा अट्टाहास,
अथक परिश्रमांनी केली विद्या जोपासना
दिशाहीन युवकांना प्रेरणा दायी विचार दिले खास.॥७||
शिलोँग येथे आय आय एम मधे दिले व्याख्यान,
प्रकृतीमधे होऊन बिघाड,कोसळले ते धरणीवर
२७ july २०१५ रोजी प्राणजोत मालवली
भारत देशाचा सुपुत्र विलीन झाला मातृभुमीवर .॥८॥
कवी - चंद्रकांत खोसे सर,
कामोठे , नवी मुंबई
मोबाईल नंबर-8108469635




मस्त चंद्रकांत गुरुजी
ReplyDeleteजय हो !