राहुरी फॅक्टरी येथील दुकानदाराचा महाप्रताप
भगर खाल्याने 7/8 महिलाना विषबाधा, 3 महिला आय सी यु मध्ये,
(अहमदनगर -प्रतिनिधी,-प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे)
सध्या नुकतीच मोठया प्रमाणात नावरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, महिला माता भगिनी मोठया आनंदाने व मनोभावे देवीचा उपवास धरून आपल्या मनोकामना पूर्ण करतात,या वेळी भगर,साबुदाणा ,खजूर व आदी उपवासाचे साहित्य दुकानातून खरेदी करतात, मात्र,दुकानदाराला या नारात्रोत्सवसचे काहीही घेणे देणे नसल्याने खराब असलेला माळ बिनबोभाट माथी मारतात,,अशीच एक घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली, मुसळवादी, गंगापूर, खळी, येथील किरकोळ विक्रेत्यानी राहुरी फॅक्टरी येथील एका नामां कीत दुकानातून या उपवासाच्या पदार्थाची खरेदी केली, त्या किरकोळ विक्रेत्यांकडून या माता भगिनींनी खरेदी केली,व ते उपवासाची भगर सेवन करताच तयाना मधेरात्री त्रास सुरू झाला त्वरीत या महिलांना प्रवरा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले,तपासणी अंती भगर सेवन केल्याने विषबाधा झाली आहे, असे निदान वर्तविण्यात आले आहे,यातील 3 महिला आई सी यु मध्ये दाखल असून बाकी महिला व 1 पुरुष यांचेवर जनरल वॉर्ड मध्ये उपचार सुरू आहेत,डॉक्टरनी शर्थीचे प्रयत्न करून आपली जबाबदारी पार पडत आहेत, दुकानदार जरी लबाड निघाला, स्वार्थपोटी माता भगिनींच्या जिव्वा वर उठला असला तरी ,या पवित्र नवरात्रोत्सवात मात्र माता भागीणीं च्या रक्षणासाठी धावून आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, थोडक्यात,'"देव तारी त्यास कोण मारी 'याची प्रचिती येथे आल्याशीवाय राहत नाही, दुकानदार बाबतीत मात्र, "संसार केला कोट्यन कोटी ,मेल्यावर मात्र संग येईना लंगोटी''असे म्हटल्यास अति योग्य राहील ,असेही या ठिकाणी म्हणावेसे वाटते व ते सार्थ राहील,
नागरिकांच्या मते सदर ची बाब ही अतिशय गंभीर असून संबंधित अन्न व औषध प्रशासन खात्याने या प्रकारची कसून चोकशी करून संबधीत दुकानदार यांचेवर लवकरच कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे





0 Comments: