उपायुक्तांच्या ओला व सुका कचरा विलगिकरण मोहिमेच्या वादातून केडीएमसी (काँट्रॅक्ट) महिला क्रिष्टलने मिक्स कचरा टाकणाऱ्यावर केला चाकूने हल्ला
वार्ताहर : डोंबिवली (ठाणे)
दि. २२ ऑक्टो. २०२०
डोंबिवली पूर्वेकडील आंबेडकर चौक, महावीर टॉवर येथे मिक्स कचरा रस्त्यावर टाकत असताना झालेल्या वादातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काँट्रॅक्ट मध्ये काम करीत असलेल्या महिला क्रिष्टलने एका अज्ञात इसमावर चाकुने हल्ला केल्याने नागरिकांच्या मनात खूप मोठे भय आणि चिंता निर्माण झालेली आहे. घरातील साधा कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावर सुदधा मोठया प्रसंगाला सामोरे जावे लागत असेल तर आम्ही करावे काय ? हा चिंताजनक प्रश्न नागरिकांच्या डोळ्यासमोर सतत येत असला तरी यावर ते त्रस्त होऊन उपाय शोधत आहेत. कल्याण डोंबिवलीच्या सुका व ओला कचरा मोहिमेनुसार गेल्या कोरोना संसर्गापासून फक्त लोकांना नव्हें तर संपूर्ण केडीएमसी कामगार व वाहनचालकांच्या जीवावर बेतले असूनही डोंबिवलीकरांचे अजून डोळे उघडलेले नाहीत. या सुका व ओला कचरा विलगिकरणापायी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव स्वतःवर ओढवून कित्येकांनी आपली प्राण सुद्धा गमावले आहे तरीही केडीएमसीने त्याचा अद्याप विचार सुद्धा केलेला नाही आणि हा खूप मोठा प्रश्न आता रस्त्यावर रक्ताच्या धारा बघण्यास नागरिकांना भाग पाडत आहे हे बोलण वावगं ठरणार नाही.
उपायुक्त कोकरे साहेब यांच्या सुका व ओला कचरा विलागीकरण मोहिमेनुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कागद, कपडा, लाकूड, पेपर, नारळ, विसपेर ,ड्रायपर काच अश्या पद्धतीने वर्गीकरण करावे लागते ते प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळेच लोक नजर चुकवून कुठेही कचरा टाकण्यास पळवाट काढत असतात. आणि त्यात मिक्स कचरा सापडल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार नागरिकांना रु. २००/- , रु. ५००/- , रु. १०००/- अश्याप्रकारे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते यामुळे नागरिक त्रस्त होऊन आज ही वेळ आलेली आहे. केडीएमसी (कॉन्ट्रॅक्ट) मध्ये क्रिष्टल म्हणून काम करत असलेल्या महिलेने केलेले कृत्य हे पूर्णपणे चुकीचे असून अमानुष आहे तिला योग्य ती कारवाई झालीच पाहिजे व पुढील अशी कृत्य घडू नयेत यावर एक सुज्ञान नागरिक म्हणून डोंबिवलीकरांनी प्रत्येक्षात लक्ष द्यावे व यावर पालिकेला जाब विचारावा.




0 Comments: