किती सोसावा एकांत (गीत)

किती सोसावा एकांत (गीत)

 किती सोसावा एकांत (गीत)


चंद्र माझा प्रियकर त्याची मी प्रेयसी,

चांदणी मी नभात राहू एकटी कशी...।।धृ।।


तो हवा सोबतीला सुनी वाटते रात्र,

मनी सले विवेक लिहावे प्रेम पत्र,

त्याचे अन माझे जुळुनी यावे रे गोत्र,

राहावा माझ्या सोबती सदैव आकाशी,

चांदणी मी नभात राहू एकटी कशी,

चंद्र माझा प्रियकर त्याची मी प्रेयसी...।।१।।


धरती वरी फुले रातराणी गंधीत,

अंधार पांघरुनी झोपे अवनी शांत,

स्वर गुंजे रातकिड्यांचा मम् कानात,

किती सोसावा एकांत आज मी उराशी,

चांदणी मी नभात राहू एकटी कशी,

चंद्र माझा प्रियकर त्याची मी प्रेयसी...।।२।।


गीतकार :- सूर्यकांत आंगणे

ताडदेव बने कंपाउंड 

मुंबई ४०००३४

भ्रमणध्वनी क्रमांक : ८१०४०६२९५०

0 Comments: