महाराष्ट्र नगर मित्र मंडळच्या वतीने कोरोना  प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.

महाराष्ट्र नगर मित्र मंडळच्या वतीने कोरोना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.


  महाराष्ट्र नगर मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव._   *मंडळाचे हे 22 सावे वर्ष असून, आजपर्यंत मंडळाने अनेक उपक्रम राबवून सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपला ठसा उमटवला आहे.* 

 _कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे जणू काही संपूर्ण जगाचा व्यवहारच ठप्प झाला होता._ 

  रस्त्यावर उतरणं, एकत्र उठणं-बसणं, हात मिळवणे अशक्य झाले असताना, *केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने संपूर्ण व्यवस्था बंद करून कोरोना व्हायरस चा वाढता प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले.* 

अशा बिकट प्रसंगात ज्या ज्या *शासकीय, निमशासकीय आणि खाजगी उपक्रमांनी त्यावेळी आपल्या जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता, जे योगदान दिले त्याची दखल घेऊन, डोंबिवली पश्चिम येथील महाराष्ट्र नगर, उमेश नगर आणि गरीबाचा वाडा या विभागातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते तसेच सफाई कामगार, पोलीस, वाहतूक पोलीस, आरोग्य कर्मचारी, भारत गॅस, हिंदुस्तान गॅस एजन्सीचे कर्मचारी, पोस्टमन, अग्निशमन दल, महावितरणचे कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारीवर्ग तसेच सामाजिक संस्था, एनजीओ आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेले सरकारी व खाजगी ॲम्बुलन्स व्यवस्था या सर्वांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन विभागातील कार्यकर्त्यांना स्थानिक डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या कार्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचा सोहळा साजरा करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!* 

  _मंडळाच्यावतीने अध्यक्ष सुभाष कदम, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य आणि सभासद यांनी सर्वतोपरी मेहनत घेऊन हा कार्यक्रम उत्कृष्ट पणे साजरा केला._ 

 *ह्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले ते मंडळाचे सदस्य, माजी कार्याध्यक्ष कैलास सणस, सदस्य देवेंद्र पवार आणि उत्तम जाधव यांनी निवड करून गेले दहा दिवस संपूर्ण कार्यभार संभाळला.*



0 Comments: