डोंबिवलीतील दुकाने रात्री नऊ वाजेपर्यत सुरु ठेवण्याची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्य शासनाच्या निर्देशानुसार दैंनदिन जनजीवन सुरळीत सुरु होत आहे. मात्र शहरातील दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यतच सुरु ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे. नवरात्र आणि दसरा सण जवळ आले असून सणासुदीच्या काळात बाजारपेठाना सवलत देण्यात यावी असी एकूण मागणी जोर धरु लागली आहे.हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट यांना रात्री ९ वाजेपर्यत सुरु ठेवण्याची परवानगी आहे.मात्र दुकानदारांना याबाबत सवलत मिळत नसल्याने दुकानदारांबरोबर नागरिकांनाहि त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात डोंबिवली व्यापारी महामंडळाने पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून दुकानांची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे.
डोंबिवली व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर,सचिव नवीनभाई माल्दे, सरचिटणीस हसमुख पटेल आणि कार्यकारी प्रमुख दिनेश गोर यांनी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले कि,मार्च २०२० पासून कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झाले. व्यापारी वर्गाने राज्य सरकारला साथ दिली असून दुकाने बंद केली.या परिस्थितीला सहा महिने उलटले असून हळूहळू दैंनदिन जीवन पूर्वीप्रमाणे सुरु करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्याच्याच भाग म्हणून शहरातील दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यत सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.आधीच लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.प्रशासनाने व्यापारी वर्गाची भावना लक्षात देऊन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत डोंबिवली शहरातील दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केल्याचे कार्यकारी प्रमुख दिनेश गोर यांनी सांगितले.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकारी यांनाहि निवदेन देण्यात आले आहे.




0 Comments: