पंतप्रधान स्वनिधी योजनेत पथ विक्रेताना कर्ज मिळेना...

पंतप्रधान स्वनिधी योजनेत पथ विक्रेताना कर्ज मिळेना...

  पंतप्रधान स्वनिधी योजनेत पथ विक्रेताना कर्ज मिळेना...

  खेळते भांडवली कर्ज कागदावरच..

 डोंबिवली ( शंकर जाधव ) आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजनांचा लाभ  मिळावा असा मुख्य उद्देश असतो.परंतु अश्या योजना राबविताना प्रत्यक्षात त्यासाठी सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे व आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता केल्यानंतरही त्याचा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा होत नसल्याचे अनेक वेळेला समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये नुकसान झालेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान स्वनिधी योजना राबविण्याचा प्रयत्न केला. याला पूर्णतः यश आले नसून पथविक्रेत्यांनी याचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.सोमवारी पथविक्रेते पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात संबंधित अधिकार्यांना याचा जाब विचारणा आहेत.

     केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी हा पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म योजना राबविण्यात आली आहे.सदर योजने अतंर्गत नागरी पथविक्रेते १ वर्षाची परतफेड मुदतीवर १० हजार पर्यतचे खेळते भांडवली कर्ज आणि त्याची दरमहा तिमाही जमा केली जाईल.तसेच डिजिटल व्यवहारावर कॅशबँक सुविधा देखील आहे अशी योजना असून यासाठी पथविक्रेत्यांनी पालिकेच्या कार्यालयात आधारकार्ड, बँक पासबुक आणि निवडणूक ओळखपत्र आणि पथविक्रेते असल्याचा आवश्यक पुरावा अशी कागदपात्रांची प्रत जमा करावी लागते.यासाठी पालिकेच्या कार्यालयात १५० रुपये आकारले. त्यानंतर पालिकेचे पथकपमुख याचा पंचनामा करून कर्जासाठी अर्ज करणारा पथविक्रेता असल्याची शहानिशा केली जाते.यासाठी कमीत कमी १५ ते २० दिवस लागत असून त्यानंतर पालिकेकडून पथविक्रेत्यांना बँकेत कर्जासाठी आवश्यक असलेले शिफारस पत्र दिले जाते.मात्र पथविक्रेते बँकेत कर्जासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र सादर केल्यानंतरही बँक कर्ज देण्यास नकार देत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.या किटकट आणि त्रासदायक प्रक्रियेला कंटाळलेले पथविक्रेते सोमवारी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात `फ`प्रभाग क्षेत्र हद्दीतील पथप्रमुख संजय साबळे यांची भेट घेणार आहेत.याबाबत पथविक्रेते किशोर सोनी आणि संदीप नाईक यांनी पालिका प्रशासन आणि बँक यांनी कोणतीही आवश्यक कागदपत्रे हवी असल्याची माहिती पथविक्रेत्यांना देणे गरजेचे आहे. तशी माहिती दिली जात नसल्याने पथविक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.केंद्र शासनाने पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर करताना या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता.अश्या योजना प्रत्यक्षात अमंलात आणल्या जात आहे कि नाही त्याकडे कोणाचेही लक्ष नाही हे यावरून दिसून येते.तर पथ =प्रमुख साबळे यांना विचारले असता ते म्हणाले,या योजनेचा लाभ पथविक्रेत्यांना होणार आहे. पथविक्रेत्यांना आवश्यक मदत करणे आणि त्यांच्या कागदोपत्रांची पूर्तता करणे एवढेच काम आहे. जर काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर अश्या पथविक्रेत्यांनी पालिकेशी संपर्क साधल्यास त्यांना माहिती दिली जाईल असे सांगितले.

 चौकट

 योजनेसाठी डोंबिवलीत सुमारे ५ हजार पथविक्रेत्यांची नोंद..

 पालिका हद्दीत पथविक्रेत्यांची नोंद करण्याच्या कामास लॉकडाऊनमध्ये ब्रेक लागला.अनलॉकमध्ये केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी हा पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म योजना राबविण्यात येत असली तरी या योजनेसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी डोंबिवलीत सुमारे ५ हजार पथविक्रेत्यांची नोंद झाली असून पथविक्रेते या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढे आले नाही. बँकेची नकारघंटा आणि पालिकेचे सोयीस्कर उत्तर यामुळे पथविक्रेते या योजनेपपासून वंचित राहत असल्याची वास्तविकता समोर आली आहे.  

0 Comments: