कथा : लोकशाहीतील संवाद

कथा : लोकशाहीतील संवाद

लोकशाहीतील संवाद

हेमकांत मोरे



 लोकशाहीत  संवादाला फार  व अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकांनी, लोकांसाठी , लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही .आणि मानव प्राणी तर संवादा शिवाय जगू शकत नाही .ज्यादिवशी मानवा - मानवातील संवाद संपुष्टात येत असतो त्या दिवसापासून संवादाची जागा इतर विध्वंशक हत्यारे घेत असतात आणि एकदा का सशस्त्र संघर्ष उफाळून आला की दोन्ही बाजूकडून शौर्या प्रमाणे क्रौऱ्याचेही दर्शन घडविले जाते. यांचे  अनेक उदाहरणे जगभर घडली आहेत आणि त्यांचे भयंकर घातक व मानवी जीवनावर विपरीत अशा परिणामांची  शृंखलाच  समोर येत असते .


आपण जे काही आज सर्वत्र पाहत आहोत एक समुदाय दुसऱ्या समुदायाला संशयाच्या नजरेने पाहत आहे एक समुदाय हा फक्त आणि फक्त माझेच कसे योग्य आहे आणि समोरच्याचे कसे वाईट, घातक ,मारक असून त्यापासून इतरांना कसे लांब ठेवता येईल असा आटापिटा करत आहेत .म्हणजेच दोन व्यक्तींमध्ये, दोन मानवामध्ये संवाद घडवून आणला जात नाही. कदाचित असंही असू शकते माझे खोटे ,वाईट ,अनिष्ट इतरांना मारक असेल व ते उघडे पडू नये म्हणून दुसऱ्यांचे ऐकूनच घेणार नाही म्हणजे संवाद करावयाचा नाही, कारण संवादात विचारांचे आदान-प्रदान होऊन सारासार विचार करून मानव निर्णयाप्रत येत असतो .


लोकशाहीचा पायाच संवाद आहे त्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाल्या जवळचा कालखंड .भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारत अनेक तुकड्या- तुकड्या मध्ये विभागला होता ,जवळपास 565 लहान मोठे संस्थानिक रुपी तुकडे होते. व प्रत्येक संस्थानीक रुपी  तुकड्यांवर कोणाचे नाही तर कोणाचे साम्राज्य होते. एवढ्या मोठ्या भुखंडास एकत्रित बांधून  ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर त्या काळातील सर्वसमावेशक नेत्यांनी व त्यांनी सर्वांमध्ये घडवून आणलेल्या संवादामुळे .


एकमेकांच्या गरजा ,उणिवा ,इच्छा , अभिलाषा भविष्यातील स्वप्न हे सर्वकाही संवाद घडवून आणल्यामुळे एकमेकां समोर ठेवल्यामुळे व संवाद घडत असताना एक दुसऱ्याला मदत करण्याची भावना उत्पन्न झाल्यामुळे, एकमेकांवर प्रखर विश्वास संपादन झाल्यामुळे शक्य झाले व हे फक्त आणि फक्त संवादामुळे .


विविध भाषा , वेशभूषा ,चालीरीती, परंपरा , आर्थिक असमानता, भूप्रदेश ,आचारविचार ,

जाती ,समुदाय ,वैचारिक ठेवण असणाऱ्या भारत देशाची "राज्यघटना" उत्तम अशा संवादातून तयार झाली आहे .भारतात लोकशाही उदयास यावी म्हणून संविधान सभेतील साधारणपणे 209 सदस्य अविरतपणे एकमेकांशी संवाद करत होते . बहुअंगी वैविध्यपूर्ण भारताला एकसंघ बांधून ठेवण्यासाठी  जवळ - जवळ 209 सदस्यांमध्ये वारंवार संवाद घडून येत होता. हा संवाद फक्त एक आणि दोन  दिवसांपुरता न चालता तो साधारणपणे:  141 दिवस चालला. संविधान सभेच्या बैठका ह्या जवळपास 141 दिवस चालल्या व या सर्व बैठकांमध्ये भारतीय जन माणसांच्या कल्याणासाठीचा संवाद घडून आला. त्या काळी संवादातून जनकल्याणाचा विचार झाल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली नव्हती .


ज्या लोकशाहीची निर्मिती संवादातून झाली आहे त्याच लोकशाही प्रणालीत आज संवादाचा अभाव असल्याने देशापुढे महासंकट  उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.  एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आज संवादाची नितांत गरज आहे व ही काळाची गरज देखील आहे.


दिनांक.01/02/2020.

10,अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार.


                      हेमकांत मोरे.

             94 23 91 70 74 

2 comments