आधारवाडी डंपिंग ग्राउंडमध्ये `बायोमानिंग` प्रकल्प सुरु होणार

आधारवाडी डंपिंग ग्राउंडमध्ये `बायोमानिंग` प्रकल्प सुरु होणार

 आधारवाडी डंपिंग ग्राउंडमध्ये `बायोमानिंग` प्रकल्प सुरु होणार


     शुन्य कचरा मोहीम यशस्वी होण्यास नागरिकांची मदत लागणार

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण येथील डंपिंग ग्राउंडची क्षमता संपली असल्याचे सर्वसाधारण सभेत वारंवार सांगण्यात आले.मात्र प्रत्यक्षात शहर कचराकुंडी मुक्त, ओला-सुका कचरा वर्गीकरण या कामास मुहूर्त मिळत नव्हता. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे  उपायुक्त रामदास कोकरे यांनी पदभार स्वीकारल्यावर खऱ्या अर्थाने शहरातील कचऱ्याची समस्या सुटण्याच्या कामास गती मिळाली. कर्जत, माथेरान आणि वेंगुर्ला येथे घनकचरा व्यवस्थापन विभागात काम केल्याने येथील डंपिंग ग्राउंडमध्ये कमीत कमी कचरा कसा जाईल आणि शून्य कचरा मोहीमेत नागरिकांची मदत कशी मिळेल याकडे लक्ष देण्यात आले. आधारवाडी डंपिंग ग्राउंडमध्ये `बायोमानिंग` प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यास ३ वर्षात आधारवाडी डंपिंग ग्राउंडचे पूर्ण सुशोभिकरण होईल असा दावा प्रशासनाने केला आहे.

    आधारवाडी येथील डंपिंग ग्राउंडची समस्या सुटावी आणि कमीत कमी कचरा डंपिंग ग्राउंडमध्ये जावा असा उद्देश समोर ठेवून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे  उपायुक्त रामदास कोकरे यांनी कर्जत येथे आरोग्य विभागाच्या निरीक्षकांचे प्रशिक्षण घेतले.याचा फायदा कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या जनतेला होण्यासाठी कोकरे यांनी अनेक योजना हाती घेतल्या. `बायोमानिंग` प्रकल्प हा यातील एक महत्वाचा प्रकल्प असून हा प्रकल्प शासनाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचतात. `बायोमानिंग` प्रकल्पात डेपोत एका बाजूला मशिनरी बसवली जाते मशीन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवता येते.या मशीनमध्ये चाळण्या बसविलेल्या आहेत. जेसीबीच्या सहायाने या मशीनच्या चाळणीमध्ये केवळ कचरा ( खत ) एका बाजूला, दगड तसेच काचेच्या वस्तू दुसऱ्या बाजूला तर केवळ प्लॅस्टिक तिसर्या बाजूला पडते.या तिन्ही वस्तूपुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी संचित केल्या जातात.असा हा बायोमानिंग` प्रकल्प असून यामुळे डेपोमधील कचऱ्याची समस्या सुटू शकेल.शहरात ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्यास पालिकेने निर्देश दिल्याप्रमाणे अनेक नागरिक याचे पालन करतान दिसतात. याचा परिनाम  इतका झाला कि आधारवाडी डंपिंग ग्राउंडमध्ये ७० टक्के कचरा टाकला जात नाही. कारण प्लॅस्टिक रिसायकलिंग, मेडिकल वेस्ट,बायोगॅस अश्या प्रकारची कामास वेग आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील आरोग्य निरीक्षक , अधिकारी वर्ग आणि कर्मचारी हे दिवसरात्र काम करत आहे.

      शहरात शुन्य कचरा मोहिमेबाबत बोलताना कोकरे म्हणाले नागरिकांनी ठरवले तर एका महिन्यात ही मोहीम यशस्वी होईल. यासाठी कचराकुंडी मुक्त विभाग, शहर अश्या संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. कचराकुंडी ज्या ठिकाणी होती, त्याठिकाणी दिवसातून एका आणि गरज लागण्यास दोनदा ठराविक वेळेत घंटागाडी नागरिकांकडून कचरा जमा करते. जर कोणी ओला-सुका कचरा वेगळा करून दिला नाही तर त्याचा कचरा घेतला जात नाही. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.शहरातील मच्छी मार्केट येथे मच्छी विक्री करणाऱ्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल.

0 Comments: