ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी `पर्यावरण शाळा`
डोंबिवली ( शंकर जाधव ) पर्यावरण दक्षता मंडळ ही एक स्वयंसेवी संस्था असून पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रात गेली २० वर्षे कार्यरत आहे. पर्यावरण शाळा हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे.या प्रकल्पांतर्गत पर्यावरणस्नेही सण साजरे करणे, पर्यावरणविषयक समस्यांवर उपाय योजना शोधणे,निसर्गातील घटकांची ओळख करून घेणे इत्यादी उपक्रम राबवले जातात.ह्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक प्रबोधन मिळावे आणि ते समृद्ध व्हावे ह्या उद्देशाने पर्यावरण शाळा चालवली जाते. सध्याच्या कोरोनासदृश्य परिस्थितीत अशा पद्धतीचे उपक्रम प्रत्यक्ष राबविणे अशक्य असल्यामुळे ऑनलाईन माध्यमातून हे उपक्रम राबवू शकणार आहे. सदर उपक्रम आधी रेकॉर्ड केलेले असून नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ ह्या ४ महिन्यांत घेण्यात येणार आहेत. शाळांच्या उपलब्धतेनुसार हे उपक्रम राबविले जातील.या अंतर्गत पर्यावरण विषयक काही सादरीकरण, कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी खुला असून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविता येईल.हा उपक्रम ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार असून यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा पर्यावरण शिक्षकांनी अधिक माहितीसाठी paryavaranshala2@




0 Comments: