कल्याण डोंबिवली महानगरमपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दक्ष डोंबिवलीकर करणार सीमोल्लंघन
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हीक अँड सोशल होप्स म्हणजेच दक्ष समूहाकडून आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा जाहीरनामा हा एक महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे. डोंबिवलीकर जनतेने त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची रीतसर यादी तयारी करावी असे आवाहन समूहाकडून करण्यात आले आहे. निवडणूक म्हणाली की राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते तयारीला लागतात. पण यावेळी डोंबिवलीतील दक्ष नागरिक तयारीला लागले असून यावेळी डोंबिवलीकर त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे विभागवार संकलन करणार असून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराने त्या समस्यांबाबत कृती आराखडा देण्याची आग्रही मागणी नागरिक करणार आहेत. हा उपक्रम प्रत्येक मतदारसंघात होणार असून सद्यस्थितीत डोंबिवलीमधील विविध विभागात यासाठी दक्ष नागरिकांनी समिती बनविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे आणि त्यांच्या समस्या नोंदविणे सोयीचे जावे यासाठी एक वेब पोर्टलही बनविण्यात आले असून या वेब पोर्टलवर नागरिकांना आपापल्या विभागात जाऊन स्वतःची नोंदणी करून विभागवार समस्या नोंदविणे शक्य होणार आहे. सदर वेबापोर्टलवर, नागरिकांमार्फत विभागवार जमा झालेल्या समस्यांचे एकत्रितपणे संकलन आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून येणारा कृतिशील आराखडा, यामुळे आगामी निवडणूक ही नागरिकांच्या स्थानिक समस्या आणि त्यांचे अपेक्षित समाधान, यांनाच केंद्रस्थानी ठेवून होईल अशी आशा दक्ष समूहातील सदस्यांनी व्यक्त करीत आहे. www.daccsh.org या वेबापोर्टलचा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या दिवशी रविवार २५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी सल्लागार समितीचे सदस्य आणि जव्हार मोखाडा या आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणाऱ्या वयम् चळवळीतचे प्रणेते आणि संस्थापक सदस्य मिलिंद थत्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.अधिक माहितीसाठी सम्पर्क नंदकुमार पालकर 9967024237, अक्षय फाटक 9967024237 , श्रेयस हंचाटे 9757074847 यांना संपर्क साधावा.




0 Comments: