मंदिरे खुली करण्यासाठी डोंबिवलीत भाजपचे लाक्षणिक उपोषण..

मंदिरे खुली करण्यासाठी डोंबिवलीत भाजपचे लाक्षणिक उपोषण..

  मंदिरे खुली करण्यासाठी डोंबिवलीत भाजपचे लाक्षणिक उपोषण.. 



 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात राज्य सरकारने सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला.सात महिने उलटून गेल्यावर हळूहळू दैनदिन जीवन पूर्वपदावर येत आहे.मात्र भाविकांसाठी मंदिरे का उघडली जात नाही असा प्रश्न उपस्थित करत मंगळवारी डोंबिवलीत भाजपने लाक्षणिक उपोषण केले.यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणास बसले होते.

  महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याकरता राज्यभर भाजपच्यावतीने उपोषण करण्यात आले. डोंबिवलीतहि फडके रोड वरील श्री गणेश मंदिर समोर भाजपाने लाक्षणिक उपोषण केले.यावेळी आमदार तथा सरचिटणीस रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभूघाटे,जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष मिहीर देसाई, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी,डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी,डोंबिवली पश्चिम सरचिटणीस समीर चिटणीस, नगरसेवक संदीप पुराणिक,राजन आभाळे,पप्पू म्हात्रे, पूर्व मंडल महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील,वर्षा परमार आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.उपोषणास बसल्यानंतर उपोषणकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, लोकशाहीचा आदर करत कुठेही कायद्यात अडथळा न आणता आंदोलन करत राहने या भावनेने  गणपती मंदिर समोर आंदोलन करण्यात आले.सरकरला जाब आणण्यासाठी हे उपोषण असून सरकारने यातून बोध घेतला पाहिजे.आमचे  ईश्वराकडे प्रार्थना करतो कि या सरकारला भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्याची सुबुद्धी द्यावी.

0 Comments: