माणसातील सकारात्मक माणूस मरतो तेव्हा.....
माणसातील सकारात्मक माणूस मारायला लागतो तेव्हा जगाचा विनाश जवळ यायला सुरुवात झाल्याखेरीज राहत नाही .
बुद्ध धम्मात ईश्वराला जागी माणूस ही संकल्पना समजली जात असते , तथागत बुद्धाला त्याकाळीअवगत झालेले ज्ञान हे जगाच कल्याणकारी ज्ञान होतं. जेव्हा एक माणूस दुसऱ्या मानवाला आपल्यासारखा समान मानव समजेल त्या अर्थी माणसातील माणूस मरणार नाही .
मानव हा विकसनशील प्राणि आहे असं जर आपण मानत असू तर त्याच्यात सतत होत राहणारा सकारात्मक बदल हा माणसाच्या व संपूर्ण जगासाठी उन्नतीचा मार्ग आहे. उलटपक्षी मानवात नकारात्मक बदल व्हायला सध्या सुरुवात झाली आहे. बुद्ध काळात तथागताने मानवा -मानवात सकारात्मक बदल घडविण्यासाठी श्रावक संघामार्फत जनसंपर्क घडवून आणला व मानव प्रत्यक्ष कसा कृतीतून विकसनशील प्राणी आहे हे जगाला पटवून दिले. त्यावेळी देखील मानवा - मानवातील द्वेष उंच स्तरावर होता . जेव्हा द्वेश उंच स्तरावर पोहोचतो तेव्हा माणसातील सकारात्मक माणूस मरतो.
तथागत बुद्धाने माणसातील माणूस विचाराने मरू दिला नाही, विचार मरायला लागले म्हणजे माणूस मरतो. आणि विचार मरायला स्वतः माणूसच जबाबदार असतो , दुसऱ्याने जे सांगितले ते जसेच्या तसे सत्य-असत्य , चांगले-वाईट , सदोपयोगी - दुर्गोपयोगी याची पडताळणी न करता स्वीकारणे म्हणजे विचार मारायला सुरुवात होणे होय .
सकारात्मक विचार मरायला सुरुवात झाली की समोर फक्त हाडा मासाचा सांगाडा दिसत असतो . शारीरिक आकार फक्त डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग वैचारिक माणूस , सकारात्मक विचार करणारा माणूस, सत्य-असत्य , चांगले-वाईट पाहणारा माणूस मरत असतो.
आजच्या काळात माणसातील सकारात्मक माणूस मरण पावलेल्या दिसून येत आहे . विचारातून निर्माण होणाऱ्या माणसाच्या जागी हत्यारांनी, कुप्रथांनी , अंधश्रद्धानि , हेवे - दाव्यानी , मत्सराने घेतलेली आहे . जेव्हा - जेव्हा विचारयुक्त माणसाच्या जागी हत्यार , कुप्रथा ,अंधश्रद्धा, हेवे-दावे , मत्सर घेतात तेव्हा- तेव्हा माणूस नाहीसा होतांना दिसत असतो , आणि मग समोर न पाहण्यासारखे आपणास हाडा मासाचा पडलेला ढीग च ढीग दिसत असतो . व तो दिसत राहण्याची आत्ताच सभोवती परिस्थिती निर्माण झालेले असते. ढीग कमी होण्याची चिन्हे दिसणार देखील नाही , कदाचित त्या ढीगची उंची वरती आणखी वरती वाढतच जाणार आहे .
दिनांक .10 /12 /2019 .
10 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार.
हेमकांत मोरे.
94 23 91 70 74




Right sirji
ReplyDelete