कविता : (मालवणी) इलो रे कोरोना
देशात इलो रे कोरोना, भल्या भल्यांची केली दैना ।
जसो इलो तसो घालव,जीव सगळ्यांचो वाचव ।।
देवा करतय तुका प्रार्थना, ही पूर्ण कर कामना ।।धृ।।
चीन देशातून इलो, सगळ्या जगभर पसारलो ।
लागली दगावया माणसा,
अजून मिळेना औषध कसा ।।
औषध वैद्यानका लवकर सुचव- जीव सगळ्यांचो वाचव ।। १।।
देवा करतय तुका प्रार्थना, ही पूर्ण कर कामना
कोणी केल्यानं मेल्यान पाप,
आमकां भोगूचो लागलो शाप ।
पाप करणारो गेलो मरान,
पण सगळ्यांका केल्यानं हैराण।।
देवा तू रे ह्या सगळा पचव-जीव सगळ्यांचो वाचव..।।२।।
देवा करतय तुका प्रार्थना, ही पूर्ण कर कामना
आम्ही साधी भोळी माणसा,
जगताव तुझ्याच विश्वासा।
ईडा-पीडा दूर सारूनी,
मुक्त कर संकटातूनी ।।
सर्वांठायी तू संतोष जागव-जीव सगळ्यांचो वाचव..।।३।
देवा करतय तुका प्रार्थना, ही पूर्ण कर कामना
कवी हरिसंतोष उर्फ
संतोष गोपाळ सावंत✍ 8779172824/
9324389918





0 Comments: