माझे जडणघडणीतील
संस्कारक्षम"जनता केंद्र"
:-दत्ताराम पुंजाजी घुगे
माझ्या जन्माच्या काही वर्षे आदि संयुक्त महाराष्ट्र लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते.उजवे-डावे कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळ "प्रजा सोशलिस्ट"संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील महारथीच्यां खडतर श्रमातून मुंबई आपल्या महाराष्ट्राला एकशे पाच हुतात्म्यांच्या रक्तातून मिळाली आहे.त्यांचे ऋण विसरता येत नाही.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सन १९५४सालात साथी अशोक मेहता,सुमतीबहेन मोरारजी,नगरपिते श्रीमती वासंती श्राॅफ, जेष्ठ कामगार नेते साथी शांताराम तावडे, साथी भवानजी शाह, नगरसेवक आणि आमदार साथी नारायण तावडे या चळवळीतील लोकनेते यांनी जन मनाचे केंद्र"जनता केंद्र"संस्थेची स्थापना केली.संस्थेच्या उभारणीच्या कार्यात साक्षात संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे महारथी साथी एस.एम जोशी,ना.ग.गोरे,बॅ.नाथ पै, साथी मधु दंडवते, सदानंद वर्दे, तत्कालीन मुंबई मेयर युसुफ मेहेर अल्ली अशी अनेक मंडळी कार्यरत होती.आमची पिढी जन्मापासून तुळशीवाडी ड्रेनेज चॅनल तुळशीपाईप मोठ्या गटारनाल्याच्या काठावर अविकसित अंधारलेल्या कच्चरपट्टीत गरिबीत जन्मला आली,तर बकाल वस्तीत वाढत संस्कारक्षम जनता केंद्र संस्थेच्या छोट्याशा प्रागंणात बागडताना साने गुरुजी मार्गावर डॉ रेगे यांच्या दवाखान्यातून जनता केंद्रात सूटाबुटात आचार्य तथा प्र.के अत्रे (साहित्यसम्राट, लोकनेते)ऐटीत येता-जाताने पाहिले आहे.त्यांच्या सोबत जवळ रहाणारे नगरसेवक आणि आमदार राजाभाऊ मिराशी (ठुकरूल) नेहमी आम्हाला अरे पोरांनो वाट सोडा अत्रे साहेब येत आहे.अनेक वर्षे आमच्या लहानपणी हिमालयाच्या उत्तुंग व्यक्तीमत्व झुंजार नेत्यांची भाषणे व फोटो मराठा आणि त्यावेळची नियतकालिके वडिलधाऱ्याच्यां चर्चेतून वाचन करताना त्यांची महती कथनातून आम्ही वयाने मोठे होताना अगदी बालपणात आणीबाणीच्या विरोधी लढा पुन्हा मला प्रत्यक्ष पाहताना आम्ही युसुफ मेहेर अल्ली विद्यालय सातवी आठवी ईयत्तेच्या दरम्यान ही दुसरी लढाई पाहताना, केंद्रीच्या भूमिगत तळाला जाऊन मदतकार्याचे भाग्य विद्यार्थीदशेत मिळाल्याचे कृतार्थ आहे.
मला ताडदेव,तुळशीवाडीत गेल्या पंचेचाळीस वर्षे सन एकोणीसशे सत्तावन सालापासून ते एकोणीसशे नव्व्यान्नव सालापर्यंत जनता केंद्र संस्थेच्या स्तुत्य उपक्रम, राष्ट्रीय कार्य,आजचा विद्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक माझ्या जडणघडणीची पाठशाला, अर्थात माझे मुक्त विद्यापीठ संस्कारक्षम वाटचालीचा आमचा मैलाचा मार्गदर्शन केंद्रबिंदू आहे.
सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रात गेली ६५वर्षे जनता केंद्र संस्था मोठ्या जोमाने कार्यरत आहेत.निष्ठेने व अविरतपणे ताडदेव विभागातील आर्थिक_सामाजिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील जनतेची शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उन्नती करण्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करत आहे.
जनता केंद्र बालवाडी: मराठी आणि इंग्रजी भाषा व व्यक्तीमत्व विकास योग्य व्हावा, मुलांमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जनता केंद्रतर्फे विभागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या पाल्यांसाठी अत्यंत माफक फी गेली ६४वर्षे कार्यरत आहेत.आम्हीही या पाठशालेचे विद्यार्थी होतो.दि.१५जुन २०१५ पासून इंग्लिश माध्यमातून बालवाडी जनता केंद्र ताडदेव संस्थेच्या माध्यमातून प्ले ग्रुप,नर्सरी,के.जी.ज्युनियर, आणि सिनियर हे वर्ग अत्यंत अल्प फी घेऊन सुरू करण्यात आले आहे.बालवाडीतील प्रत्येक मुलांची प्रकृती सुदृढ रहावी या हेतूने दररोज बालवाडीतील मुलांना संस्कारक्षम शिक्षणाबरोबरच विनामूल्य पोषक आहार. गोड शिरा, भाजलेले व उकडलेले शेंगदाणे,कांदे-बटाटा पोहे व दूध-बिस्किटे यांचा समावेश असतो.
बौद्धिक स्वरुपात साथी अॆस.अॆम.जोशी स्मृतिदिन संस्थेचे आधारस्तंभ,स्फुर्तिदाते, जेष्ठ समाजवादी नेते यांचा स्मृतिदिन १एप्रिल अनेक वर्षांपासून त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन भावपूर्णपणे आयोजित करण्यात येत आहे.
तसेच एक मे महाराष्ट्रदिनी समाजवादी विचारवंत साथी नानासाहेब गोरे व संस्थेचे संस्थापक साथी नारायण तावडे यांचाही स्मृतिदिन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दरवर्षी आठवणी जाग्या होतात.
ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक व अनेक वर्षे जनता केंद्र संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत स्वर्गिय साथी भवानजी शाह यांचा स्मृतिदिन दि.१४सप्टेंबर, आणि जनता केंद्र संस्थापक साथी अशोक मेहता स्मृतीदिन संस्थेचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित सुवर्ण इतिहास आठवणीतून जागा केला जातो.जनता केंद्राचे संस्थापक साथी शांताराम तावडे यांचे
स्मृत्यर्थ २४वे नेत्र-रुण्य चिकित्सा तपासणी शिबिर प्रत्येक वर्षी संस्था माफक दरात चष्मेवाटप मोतिबिंदू रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया करिता पाठविण्यात येते.तसेच बारा वर्षांखालील मुलांसाठी मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले जाते.जनता केंद्र आधारस्तंभ, समाजवादी नेते डॉ.पी.व्ही मंडलिक यांचे स्मृत्यर्थ गेली ४०वर्षे पंचवीस फेब्रुवारी दिवशी मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिर श्री ताडदेव क.वी.ओ.जैन संघ,श्री ताडदेव कच्छी जैन युवक मंडळ,श्री ताडदेव व्यापारी मंडळ,श्री ताडदेव तुळशीवाडी बझार व फरादी जैन महाजन मुंबई आदि मित्र संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करून बृहन्मुंबई महानगरपालिका बाई यमुनाबाई नायर रुग्णालयाच्या रक्तपेढीला आपले रक्तदान केले जाते.यामध्ये महिला रक्तदात्यांचे प्रमाण वाढतं आहे.मी स्वता: अनेक वेळा रक्तदान केले होते.
जनता केंद्र संस्थेच्या वाचनालयाचा शासकीय गौरव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार १९८५ "ब"वर्ग प्राप्त ताडदेव जनता केंद्र संस्थेच्या उद्देश असा की जनमानसात वाचनाची आवड निर्माण व्हावी व ती वृध्दींगत करावी कामगार वर्गिय आणि परिवाराला सर्वांसाठी अनेक दुर्मिळ पुस्तके व आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम मराठी ग्रंथ वाचण्यासाठी खजिना जनता केंद्र ताडदेव येथे उपलब्ध आहे.सतत वाढणारी महागाईमुळे सामान्यजनांना वर्तमानपत्रे, नियतकालिके उपलब्ध आहे.विभागातील नागरिकांच्या हवेशीर प्रसन्न वातावरणात ९-मराठी,३-इंग्रजी,३-हिंन्दी,२-गुजराथी अशी पंधरा वर्तमानपत्रे व ३२मराठी, इंग्रजी, गुजराती व हिंदी नियतकालिके इत्यादींचा लाभ वाचक सकाळी दहा ते दुपारी एक वाजता तर सायंकाळी साडेपाच ते रात्री साडे आठ पर्यंत मुक्तव्दार वाचनालयाचा लाभ आतापर्यंत पाच हजार नागरिकांनी या दालनाच्या लाभ घेतला आहे.मराठी साहित्यातील दर्जेदार साहित्यकृतीचा लाभ अनेक वाचकांनी अल्प वर्गणीत आजही घेत आहेत.जनता केंद्र ताडदेव माधवी संदर्भ ग्रंथ संग्रहालय, आणि चंद्रकांत पाटकर राजकीय दालन राज्यशास्त्र, राजकारण व समाजकारण अभिरूची साहित्य भंडार वाचकांना उपलब्ध आहे तर विनामूल्य बाल व कुमार साहित्य विभाग ग्रंथ संग्रहालय सुज्ज उपलब्ध आहे.
जनता केंद्र संस्थेच्या आसपासच्या परिसरातील कामगार, मध्यमवर्गीय व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या विद्यार्थ्यांसाठी शांत चित्ताने अभ्यासासाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन सकाळ व संध्याकाळ मोफत अभ्यासिका जनता केंद्र वाचनालय अनेक वर्षापासून उपलब्ध आहे.शालेय, आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे.आजही प्रतिसाद विद्यार्थीजनांकडून मिळत आहे.
लहान मुलांचे आरोग्य व बौद्धिक विकासाचे तंत्र यावर मोफत व्याख्यान श्री अथर्व आयुर्वेदिक चिकित्सालय डॉ सुशांत नागरेकर यांनी बालकांचा आहार कसा असावा.बदलत्या ॠतुनुसार आहारात बदल का करावेत व कोणते?भूक न लागणे चटपटीत खाणे अंगी न लागणे अशा बालकांसाठी काय करावे? वारंवार आजारी पडण्याची कारणे काय?रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी,स्वर्णप्राशन संस्कार काळाची गरज यावर उत्तम प्रकारे उपस्थितांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष तुकाराम मांजवलकर व कार्यकारी विश्वस्त विश्वस्त विश्वनाथ मलुष्टे यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम कौतुकास्पद आहे.जनता केंद्र संस्थेचा शारदोत्सव युसुफ मेहेर अल्ली विद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि जनता केंद्र संयुक्त विद्यमाने आंतरशालेय निबंध, कथाकथन, चित्रकला,वक्रृत्व व प्रश्न मंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले भिकाजी मलुष्टे व श्रीमती अस्मिता भिकाजी मलुष्टे परिक्षक काम केले.१९/११/२०१७यशस्वी विद्यार्थ्यांना परिक्षकांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
दिवाळी अंक व ग्रंथ प्रर्दशन:वाचन -संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी दिवाळीच्या आनंदमय वातावरणात व उत्साहात जनता केंद्र वाचनालयातर्फे ३८वे यंदा दिवाळी अंक ग्रंथ प्रर्दशन रविवार दिनांक २७/१०/२०१९सकाळी दहा वाजता वृत्तपत्र लेखक आणि गरुडझेप प्रकाशक-दत्ताराम घुगे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे.आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत.
लेखक-
दत्ताराम पुंजाजी घुगे
४०५ए, शिवम् संत तुकाराम महाराज चौक कार्पोरेशन बॅंकजवळ छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स दहिसर आनंद नगर
दहिसर पूर्व मुंबई 68
मोबाईल नंबर
8169747724
9821793708
ई-मेल
ghuge.dattaram@gmail.com
dattaram45@yahoo.com




0 Comments: