कविता : जख्मा
पाहू नकोस अंत
ममया हृदयाचे
जख्मा सुगंधी आहे
ते घाव काळजाचे ||धृ||
सांगू कसे मी आता
बागेतल्या फुलाला
गुलखंद सोंसले ते
सारेच यवनाचे ||१||
आहे कळी अजूनी
का भूंगतो असा तू
उमळू दिले ना तिजला
दुरभाग्य त्या कळ्यांचे ||२||
आला वसंता तेथे
पहातो वाट येथे
सांगू कसें मी तुजला
व्यथा रे ह्या धरेचे ||३||
आहे नरेशा क्षणाचा चा
प्रवाशी जीवनाचा
मर्म समजले ते
अंतीम जीवना चे ||४||
- कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो.७५१७३८९७४६




0 Comments: