मनिषा ताई वाल्मिकी यांच्यावर केलेल्या बलात्कारीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची सरकारकडे मागणी, नाहीतर राष्ट्रभर निषेध व जनआंदोलनाचा इशारा..!!
ठाणे, डोंबिवली : (प्रविण बेटकर)
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मागासवर्गीय वाल्मिकी समाजातील तसेच हाथरस मध्ये यु. पी. एस. परीक्षेत पहिली आलेली मनीषा (ताई) वाल्मिकी यांच्यावर काही जातीयवादी गाव गुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापून व बेदम मारहाण करून अमानुषपणे हत्या केली. त्या अमानुष व जातीयवादी गुंडांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही आणि देशात अन्याय व अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण भारतात जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मानपाडा पोलिस ठाणे, डोंबिवली (पूर्व) येथे वपोनि श्री. दादाहरी चौरे व कोळसेवाडी पोलिस ठाणे, कल्याण (पूर्व) येथे वपोनि श्री. साळवे यांना दिलेल्या निवेदनातून सरकारला करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश महासचिव तथा राज्य पी. आर. ओ सचिनभाऊ लक्ष्मण नांगरे व महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य हितेश भालेराव, ठाणे जिल्ह्याच्या वतीने कल्याण डोंबिवली शिष्टमंडळातर्फे कल्याण शहर युवा अध्यक्ष बापूजी ढालवाले, डोंबिवली शहर युवा अध्यक्ष प्रविण बेटकर (पत्रकार), सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे ह्यांचे नातू पक्षाचे कला व सांस्कृतिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव शाहीर प्रशांत शिंदे, मुंब्रा शहर वाहतूक अध्यक्ष अशरफ बरमारे, भानुदास गायकवाड (पत्रकार) आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व घटनेचा तपास महाराष्ट्र पोलीस ह्यांच्या मार्फत व्हावा असेही निवेदनात सादर करण्यात आले.





0 Comments: