कल्याण- डोंबिवलीतील पहिल्या अद्यावत वातानुकुलीत अभ्यासिकेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

कल्याण- डोंबिवलीतील पहिल्या अद्यावत वातानुकुलीत अभ्यासिकेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 कल्याण- डोंबिवलीतील पहिल्या अद्यावत वातानुकुलीत अभ्यासिकेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण 


       गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणपद्धतीमध्ये फायदा

डोंबिवली ( शंकर जाधव ) सर्व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वापर करावा असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.याचा विचार करत गरीब विद्यार्थ्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि नगरसेविका गुलाब म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कोपर रोड येथे अद्यावत वातानुकीत अभ्यासिका सुरु करण्याचा निर्णय घेतला.कल्याण- डोंबिवलीतील या पहिली अद्यावत वातानुकीत अभ्यासिकेचे सोमवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले.या अभ्यासिकेमुळे गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणपद्धतीमध्ये फायदा होणार आहे.

        यावेळी महापौर विनिता राणे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, युवा नेतृत्व प्रवीण म्हात्रे,विभागप्रमुख मनोज म्हात्रे,उपशहरप्रमुख किशोर मानकामे, आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्ये संख्येने उपस्थित होते.सोमवारी कल्याण- डोंबिवलीतील या पहिली अद्यावत वातानुकीत अभ्यासिकेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरविकास व पालकमंत्री  शिंदे म्हणाले, या अभ्यासिकेमुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभे राहण्यास मदत होईल.ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.तर स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले,कोपर रोड येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी आणि चाळींमध्ये अभ्यासाला पोषक असे वातावरण नसते. त्यामुळे त्यांना अभ्यास करताना अडचण येत असते. असे असूनही येथील विद्यार्थी शिकून मोठ्या पदावर गेले आहेत.येथील विद्यार्थ्यांना शिकताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अद्यावत वातानुकीत अभ्यासिका सुरु केली तर येथील सर्व विद्यार्थी शिकून देशाचे नाव मोठे करतील. म्हणूनच कल्याण-डोंबिवलीतील सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला पाहिजे.या अभ्यासिकेत शिक्षणासाठी आवश्यक अशी सर्व पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक प्रगती हीच खरी देशाची श्रीमंती असते.या अभ्यासिकेत अभ्यासाठी निवांत वातावरण असून  सीसीटीव्ही कॅमेरेहि लावण्यात आले आहेत.

    

   

 

Attachments area

0 Comments: