महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा कल्याण खडकपाडा येथे नामफलक अनावर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा कल्याण खडकपाडा येथे नामफलक अनावर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

 महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा कल्याण खडकपाडा येथे नामफलक अनावर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.


कल्याण -डोंबिवली (ठाणे) पत्रकार : प्रविण बेटकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.२३ ऑक्टोबर रोजी कल्याण खडकपाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मा. मनोज चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. आर एंड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड (घनकचरा विभाग कडोंमपा) चे कामगार व वाहनचालक महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व सोडून दुसऱ्या संघटनेच्या भूल थापांना बळी पडून उध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना सन्माननिय राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाला सलाम करुन म.न.का.सेनेच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र आले त्याची ग्वाही आणि हमी देण्यासाठी मनकासे. चे उपाध्यक्ष मा.राजेशजी उज्जैनकर, सरचिटणीस मा.गजानन राणे, कार्यध्यक्ष मा.संतोष धुरी, कडोंमपा नगरसेवक/गटनेते मा.मंदार हळबे, कल्याण जिल्हा अध्यक्ष मा.उल्हासजी भोईर, कल्याण शहर अध्यक्ष मा. कौस्तुभ देसाई तसेच शैलेश पाटणकर, प्रशांत इशी, चिटनीस दिनेश चव्हाण, केतन नाईक, विजय पडवळ, प्रवीण पवार, अक्षय परवडी, अक्षय पनवेलकर, मोइनउद्दीन शेख, महिला शहर अध्यक्ष श्रीमती शीतल विखनकर, महेश मोरे, दयानंद पाटिल, रोहन अक्केवार, गणेश खंडारे व्यवस्थापन प्रतिनिधि श्री विकास लांजेवार, श्री दिक्षित, रोहिदास शर्मा, श्री पंकज तसेच क.डों.म.पा.घनकचरा व्यवस्थापन (कंत्राटी) म.न.का.से. युनिटचे मच्छिंद्र तांदळे, ज्ञानेश्वर पाटील, आचल पाटील, लक्ष्मीकांत हिस्वणकर, संजय चव्हाण व असंख्य सभासद मित्र व मनकासे पदाधिकारी उपस्थित होते. काही वक्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महत्व पटवून देऊन आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असल्याचा पाठिंबा दिला. मा. राज ठाकरेंचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा विजय असो अश्या मोठया आक्रोशाची गर्जना करून तेथील वातावरण प्रेरणादायी व उत्साही झाले होते. उपस्थित मान्यवर व कामगारांचे आभार मानण्यात आले व तोंड गोड करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments: