रिक्षाचालक बौद्ध महिलेच्या पोटात लाथा घालून जातियवादी गुंडांची अमानुष मारहाण
पत्रकार : प्रविण बेटकर
मोबा. ९५९४४०१९२२
डोंबिवली (ठाणे)
दिवा येथील ही घटना असून पीडित बौद्ध महिला आहे. रिक्षा चालून ती आपला उदरनिर्वाह करत असते. बिअर शॉपी असलेल्या जातीयवादी दोन गुंडांनी तिचे हात धरून पोटात लाथ घातली आणि जयभीम वाली रिक्षा येथे लागली नाही पाहिजे असे म्हणत या बहिणीला अमानुषपणे मारहाण केली.
हाथरस हत्याकांड ताजे असतानाच महाराष्ट्रात आता हे दिवा ठाणे येथे दलित महिलेवर हल्ला करून जातियवादी गुंडांची दहशत महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून ही महिला रिक्षा चालवत स्वाभिमानाने आपले जीवन जगत आहे परंतु जातियवादी गुंडांना दलित महिला मुली करत असलेली प्रगती बघवत नसल्याने सदरचा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.या बाबत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सदर प्रकरण गांभीर्याने घेतले असुन, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. गृहमंत्र्यांनी जसं हाथरस प्रकरणी भूमिका घेतली आता या घटनेवर सुद्धा भुमिका घेऊन आरोपीना अटक केले पाहिजे.अशी भुमिका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने घेतली आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे. आरोपीना तात्काळ अटक करावी आणि पीडित महिलेच तात्काळ पूर्ववसन करून संरक्षण देण्यात यावे. तात्काळ आरोपीना अटक न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मानखुर्दचे वार्ड अध्यक्ष मा. रुपेश साखरे व पत्रकार सागर कांबळे यांनी दिला आहे.




0 Comments: