शिवसेनेच्या प्रयत्नांने कल्याण –पनवेल बससेवा सुरु..
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यावर परिवहन बससेवा बंद करण्यात आल्या होती.आता राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली असल्याने शहरांगर्त बसे सेवा सुरु झाल्यावर होत्या. परंतु शहराबाहेरील लांब पल्ल्याच्या मार्गावर हि सेवा देण्यास मनाई असल्याने यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.यावर परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला.चौधरी यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे नागरिकांच्या मागणीबाबत चर्चा केली.यावर खासदार डॉ. शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे बस सुरु करण्याबाबत चर्चा केली. शिवसेनेच्या या प्रयत्नाला यश आले असून पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संमती दिली. शनिवार पासून कल्याण-पनवेल बस सेवा सुरु करण्यात आली.सभापती चौधरी यांनी स्वतः बस मधील प्रवाश्यांशी संवाद साधला. यावेळी परिवहन सदस्य अनिल पिंगळे, वाहतूक निरीक्षक घाडी साहेब, प्रमोद बागुल, रघुनाथ वाजे व इतर कर्मचारी उपस्थित होते.यावेली सभापती चौधरी म्हणाले गणेशोत्सवाच्या काळात पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे शहराबाहेरील लांब पल्ल्याच्या मार्गावर बस सेवा सुरु करावी अशी मागणी केली होती.आता कल्याण-पनवेल बस सेवा सुरु झाली असून लवकरच कल्याण-वाशी,कल्याण-कोकणभवन आणि कल्याण-ठाणे बस सेवा सुरु करण्यात येईल. शिवसेनेच्या प्रयत्नामुळे आलेल्या यशाबाबत नागरिकांनी आभार मानले आहेत.





0 Comments: