प्रथम धरणग्रस्तांचे न्याय्य प्रश्न मार्गी लावावेत व नंतरच धरणाचे काम, धरणग्रस्त ठाम

प्रथम धरणग्रस्तांचे न्याय्य प्रश्न मार्गी लावावेत व नंतरच धरणाचे काम, धरणग्रस्त ठाम

 प्रथम धरणग्रस्तांचे न्याय्य प्रश्न मार्गी लावावेत व नंतरच धरणाचे काम, धरणग्रस्त ठाम 



सिंधुदुर्ग (कणकवली) :  बुधवार दिनांक 14 /10/20 रोजी मा.कार्यकारी अभियंता श्री कदम आणि संबंधित अधिकारी यांचे समवेत नरडवे धरणग्रस्त बांधवांची सभा ओरोस येथे संपन्न झाली.सदर सभेस मुंबई कमिटी व स्थानिक कमिटीचे पदाधिकारी, आणि इतर काही धरणग्रस्त बांधव उपस्थित होते.

सभेमध्ये प्रामुख्याने, सदोष असलेली भुखंड वाटपाची यादी दुरूस्ती करणे,पर्यायी शेतजमीन ( 65 % रक्कम जमा केली आहे व जमा करून घेणे बाबत ) मिळणे बाबत, वाढीव कुटुंब,वनसंज्ञा, मोबदला अदा करणे, सानुग्रह भूमिहीन यादी अनुदान इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

    मा. कार्यकारी अभियंता यांनी वरील सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळावा अशी मागणी केली.व धरणाचे काम आणि पुनर्वसनाची कामे एकाच वेळी सुरू ठेवू अशी विनंती केली.परंतु या गोष्टी ला कमिटीने स्पष्ट नकार दिला.प्रथम धरणग्रस्तांचे न्याय्य प्रश्न मार्गी लावावेत व नंतर धरणाचे काम सुरू करावे, असे सांगितले.

      मित्रांनो संघर्ष अटळ आहे.मुंबईसह सर्व धरणग्रस्तांनी पुढील कालावधीत संघर्षासाठी तयार रहावे.*धरणग्रस्तांच्या योग्य मागण्यांची पूर्तता न करता धरणाचे काम सुरू केल्यास पूर्वीप्रमाणेच धरणाचे ठिकाणी तीव्र आंदोलन करून काम बंद पाडण्यात येईल असा इशारा मुंबई कमिटी चे अध्यक्ष श्री सुरेश सहदेव ढवळ आणि उपस्थित सर्व धरणग्रस्तांनी दिला. 


तसेच प्रकल्पग्रस्तांना या संदर्भातील  माहिती देण्यासाठी नरडवे महंमदवाडी येथे  शुक्रवार दिनांक 16 रोजी दुपारी 2 वाजता श्री प्रभाकर ढवळ गुरूजी यांचे निवासस्थानी,(मांडावर) सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पावसाची पर्वा न करता सर्व धरणग्रस्तांनी सभेस उपस्थित राहावे अशी विनंती वजा आवाहन मुंबई कमिटीचे सचिव मधुकर पालव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहीती दिली आहे

0 Comments: