अक्षर आनंद दिवाळी अंक 2020ऑनलाईन प्रकाशित
डोंबिवली : (प्रतिनिधी )
डोंबिवली येथे अक्षर आनंद दिवाळी अंकाचे नुकतेच सुनिल खर्डीकर व संकेत खर्डीकर यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षाचा अक्षर आनंद दिवाळी अंक ऑनलाईन प्रकाशित करीत आहोत. या अंकात शब्दाची जादुगिरी सुनिता चोपडे -अमेरिका ,अलक कथा- चंद्रशेखर भारती ,एकेकाचा स्वभाव- अरुण सावळेकर, जयंत भावे यांचे पुस्तक परीक्षण, स्पॅरो फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती परब -कोरोना आणि पक्षी, गेले जगायचे राहून -ॲडव्होकेट सुनीता पागे, माझ्या आठवणीतील दिवाळी -प्रिया जोशी, अस्तित्वाची लढाई -सरिताची चितोडकर ,अवयव दान एक श्रेष्ठ दान- डॉक्टर प्रकाश माळी, भविष्यातील कल्याण -श्रीकांत पेटकर, आणि स्वाती कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी कथा ,मोबाईल नंबर बदला आणि आरोग्य टिकवा- डॉक्टर ज्यो. सोपान बुडबाडकर, श्याम सुंदर पाटील साहेबाची मुलाखत
याच प्रमाणे यामध्ये कविता विभाग ,बाल जगत, चारोळी, रचनेतील सौख्य ,यांचाही समावेश केला आहे .तसेच अमेरिका, दुबई ,हैदराबाद ,पुणे ,ठाणे ,मुंबई , यासारख्या देश-परदेशातील लेखकांनी साहित्यिकांचा समावेश यामध्ये झालेला आहे. हया अंकाचे प्रकाशन खर्डीकर क्लासेस संचालक डाॅ सुनिल खडीकर सर ,संकेत खर्डीकर, व संपादक हेमंत नेहते ,व अक्षरमंच प्रकाशनाचे डाॅ योगेश जोशीं, सर उपस्थित होते.व व सर्व लेखकांचे साहित्यिकांचे आभार याचप्रमाणे जाहिरातदार कांचन गौरी महीला पतपेढी, व खर्डीकर क्लासेस ,व सर्व जाहिरात देणार्यांचे आभार आपण हा दिवाळी अंक वाचन करून अभिप्राय संपादकांना कळवावा ही विनंती अक्षर आनंद दिवाळी अंक च्या वतीने करण्यात येत आहे.





0 Comments: