फटाकेमुक्त दिवाळी अभियान उत्साहात संपन्न

फटाकेमुक्त दिवाळी अभियान उत्साहात संपन्न

 फटाकेमुक्त दिवाळी अभियान उत्साहात संपन्न 

श्री सरस्वती विद्या मंदिर, राष्ट्रीय हरित सेना आयोजित फटाकेमुक्त दिवाळी अभियान आज उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे श्री एल.एस.महाजन सर यांनी केले.माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुरकुटे मँँडम यांनी या उपक्रमाची आवश्यकता व विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे सुरक्षित दिवाळी साजरी करावी हे छानपैकी समजावून सांगितले व कासुर्डे सर व महाजन सर यांच्या उपक्रमाची स्तुती करून पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.यानंतर प्रा.प्रदीप कासुर्डे सर यांनी विविध स्लाइडद्वारे  फटाक्यांचे फायदे, तोटे, फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम,धमाका  ऑफर असे विविध मुद्दे अतिशय सुंदररित्या व संवादी पद्धतीने मुलांना समजावून सांगितले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संकल्परुपी प्रतिज्ञा घेतली व आम्ही या दिवाळीत कमीतकमी फटाके वाजवू व उरलेल्या पैशातून पुस्तके, किल्ले साहित्य, भेटवस्तू, मिठाई , ग्रेटीग कार्ड्स घेवू अशा प्रकारचा निश्चय केला.या कार्यक्रमाला आठवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments: