- कविता : निसर्ग चक्र
होतो मी ही य्यवनात ,तेव्हां फुललो बहरलो
होता माझा ही रुबाब अन् देखणेपण आगळे
सावलीत माझ्या येत होते पाहूणे सगळे...
पशू पक्ष्यांचा होतो मी आसरा तेंव्हा
होतो मी, बहरलेलो हिरवीगार पाने फांद्या जेंव्हा
थाट माझा होता आगळावेगळा
गुराख्यांचा अन् वाटसरूचां होते विरंगुळा...
ऋतुचक्रा प्रमाणे दिवस वर्षे चालली होती
निसर्ग नियमा प्रमाणे माझी वाढ होत होती
अन् लागली वैभवशाली जीवनास उतरती कळा
सोडून गेले सारे हळूहळू मला ज्यांना होता माझा लळा...
नियतीमध्ये आहेच असेच घडणार
वय वर्षे अशीच हळूहळू वाढत जाणार
ज्यांना वाटत असते आपल्या प्रती ओढ
अखेरच्या क्षणापर्यंत जपतात मनात ओढ...
जसे,आजही पक्षी येतात माझ्या सोबतीला
नसले मजकडे आता त्यांना काही देण्याला
आहे उभा अजूनही जरी झालो उघडा बोडका
निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा थोडका
होणार आहे सर्वांच्या जीवनात निसर्गासम बदल
खंत ना करावी जीवनात होत राहणार असे बदल
निसर्ग नियमानुसार क्षणाक्षणाला आयुष्य वाढते
हसत हसत करावे स्वागत येणा-याक्षणांचे,
हे समजवावे असेच सर्वांनी नियतचक्रा प्रमाणेच घडते....
रचनाकार ©️®️ कवी दीप., कल्याण प, जिल्हा ठाणे,
महाराष्ट्र राज्य.





0 Comments: