कविता : पुन्हा पुन्हा हसायचे
आनंदाचे क्षण भाग्याचे जीवनी ह्या फुलवायचे
पुन्हा पुन्हा हसायचे इतरांना हसवायचे ।।धृ।।
आली दिव्याची दिवाळी प्रकाशात न्हाऊनी।
अंधाराला लाजवी नित्य जळत राहुनी।
ठेवा संतोष ह्रदयी जणू हे ज्योतीला सांगायचे ।।१।।
दुःख जीवनी असले जरी ताण घेऊ नये भारी।
संकटे जाती पळूनी, म्हणता राम कृष्ण हरी।।
चिंता ही चिता समान म्हणून खुलत रहायचे ।।२।।
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
दसरा गेला आणि आली हो दिवाळी
दिवाळीतील मजाच आगळी वेगळी
बहीण भावाला,पत्नी पतीला ओवाळी
आंनदी क्षण फुलावें सर्वांच्याच भाळी
ज्ञानाचा,यशाचा.किर्तीचा,सकारात्मकतेचा,उत्साहाचा,प्रसन्नतेचा अापल्या जीवनातील प्रकाशमय '' दिप '' अखंड तेवत राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना .
तेजोमय दीपावलीच्या लोकसत्यवाणी च्या वतीने सर्व प्रेक्षकांना
मन:पूर्वक लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.





सुंदर रचना
ReplyDelete