"सूर्यकांत स्तवन"

सूर्यकांत शंकर आंगणे श्री.कृष्णकांत विश्राम येरम
देवा मी तुजकडे आता मागतो एक मागणे।
यशस्वी होवो स्नेही अमुचे सूर्यकांत शंकर आंगणे।।धृ।।
रहाणी साधी तरी उमदे व्यक्तीमत्व।
बेताची परिस्थिती परि,
सांभाळी जीवन तत्व।
आंगणेवाडीचा स्वयंसेवक हा मिरवी 'साहित्यिक पत्र' भूषणें।।१।।
मुंबई आकाशवाणीवरीं केले कथा, काव्य वाचन।
वर्तमानपत्रं, मासिकातून जपें छंद, कथा काव्ये लिहून।
प्रसिद्ध झाले पुस्तक यांचे मोत्याचा घास, गुलमोहर अन् प्राजक्ताची फुले सूर्याच्या साक्षीने।।२।।
यूट्यूब चॅनलवर ऐकावी सुंदर भाव-भक्ती गीते।
चौफेर लिखाण म्हणूनीं आहे ललित ग्रंथ प्रकाशन वाटें।
कवी,लेखक, पत्रकार अन् कधी रचितों श्रवणीय गाणे।।२।।
मिळो यश त्यासी याची जन्मी।
खुलों प्रतिभा,मिळो ज्ञानवैभव, शब्द न पडों कमी।
बहरुनीं जीवन लाभों धनही सार्थ होवो जीणें।।३।।
-कवी अॅडव्होकेट श्री.कृष्णकांत विश्राम येरम, कीर्तनकार, ठाणे
मो. 9930985537




0 Comments: