कविता : दीपावलीचा सण

कविता : दीपावलीचा सण

 कविता : दीपावलीचा सण


 



आला बाई आला

दीपावलीचा सण

चकल्या,लाडू नि करंज्या

सारं सारं गोड खाणं


फटाक्यांची आतषबाजी

रोषणाईचा थाट

नव्या को-या कपड्यात

सजली पायवाट


उभा बांधावरी माझा

कष्टी शेतकरी दादा

धारा गाळूनी घामाच्या

करी जगण्याला वादा!


राखी बांधला हात

भाऊबीजे सज्ज होई

पाठीवरली बहिण

दाराकडे वाट पाही!


असा दिवाळीचा सण

साज-शृंगारीक

कुणी गरीब -अमीर

जपे रित पौराणिक!

 

  कवी-गोपाळ वेखंडे

0 Comments: