यंदाची दिवाळी सावधानतेने साजरी करूया !
प्रतिवर्षी प्रमाणे दिवाळी सुरू झाली आहे.आकाश कंदिल लागतील, लाडू, करंज्या, चकल्यांची देवाणघेवाण होईल.नविन कपड्यांची खरेदी होईल.सर्वात महत्त्वाचे म्हणजे फटाके फुटतील आणि ध्वनी तसेच वायु प्रदुषण होईल.
आपण म्हणाल हे तर नेहमीचेच आहे,यात काय नवीन.
होय नवीन काही नाही.पण ही वेळ नवीन आहे.प्रतिवर्षीपेक्षा ही दिवाळी नवीन आहे.वेगळी आहे.कोरोनाचं सावट घेऊन आली आहे.गेल्या आठ महिन्यांत कीत्येकांचे रोजगार गेले, नोकरी गेली, कित्येकांची आपली माणसं गेली.तरीही अजून कोरोनाचं सावट दूर झालेलं नाही,धोका टळलेला नाही.
आपणास विनंती करण्यात येते की, नेहमी प्रमाणे दिवाळी साजरी न करता ज्यांच खूप नुकसान झालं आहे, त्यांना थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न करूया. जे कोरोनामुळे आजारी आहेत,त्यांना फटाक्यांच्या आवाजामुळे व धुरामुळे त्रास होऊ नये म्हणून, फटाके न वाजवण्याचा संकल्प करूया.
अजून कोरोना गेलेला नाही व तो वाढू नये, यासाठी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे माझं कुटुंब माझी जबाबदारी या नियमांचे काटेकोरपणे पालन करूया.बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे, वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ करणे, आपसातील अंतर पाळणे, महत्त्वाचे कामाशिवाय बाहेर न पडणे, इत्यादी.
अशा परिस्थितीतही माझ्या कडून आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.पुढील वर्षी आपण खूप उत्साहाने दिवाळी साजरी करूया यासाठी आपल्याला ऍडवान्समध्ये शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏
मधुकर पालव





0 Comments: