फोन व ऑनलाईन फसवणुकीपासून नागरिकांनी सावध व्हा !

फोन व ऑनलाईन फसवणुकीपासून नागरिकांनी सावध व्हा !

 फोन व ऑनलाईन फसवणुकीपासून नागरिकांनी सावध व्हा !


          डोंबिवली पोलिसांचे  आवाहन 

डोंबिवली ( शंकर जाधव   )  ई-मेल तसेच दूरध्वनीद्वारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार शहरात घडत
 असून अशा फसवणुकीला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये असे आवाहन डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे 
व.पो.नि. सचिन सांडभोर यांनी केले आहे.सध्या दूरध्वनीद्वारे तसेच ई-मेलद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या 
तक्रारी वाढत आहेत. ई-मेल द्वारे अथवा इतर मार्गाने बक्षिस लागल्याचे कालवून नागरिकांना सदर बक्षिसाचे प्रलोभन
 दाखवून त्यांच्याकडून त्यासाठी पैशांची मागणी केली जाते. तसेच काही जणांना दूरध्वनी द्वारे फोन करून बँकेतून बोलत 
असल्याचे सांगून ए.टी.एम. कार्ड संदर्भात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे भासवून अथवा ए.टी.एम. कार्ड बंद पडणार
 असल्याचे सांगून ते चालू राहावे म्हणून कार्ड नंबर व त्याचा पिन नंबर मागितला जातो व कोणी तो दिल्यास सदर खात्यातील पैसे
 काढून नागरिकांची फसवणूक केली जाते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बक्षिसांच्या प्रलोभनाला बळी पडून कोणाला पैसे 
पाठवू नयेत तसेच कुणालाही आपल्या ए.टी.एम. कार्ड संदर्भात गुप्त माहिती पुरवू नये असे आवाहन डोंबिवली रामनगर पोलीस
 ठाण्याचे व.पो.नि. सचिन सांडभोर यांनी शहर वासियांना केला आहे. बँकेकडून अशा प्रकारची माहिती दूरध्वनीद्वारे विचारण्यात 
येत नाही. बँकेचे जर काही काम असेल तर बँक यासंदर्भात खातेदाराला बँकेत बोलावते. यामुळे याप्रकारे दूरध्वनी तसेच ई-मेल 
माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला य भूलता नागरिकांनी आपली संपत्ती सुरक्षित ठेवावी असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  फोन व ऑनलाईन फसवणुक करणाऱ्याला प्रत्येकाला पकडणे पोलिसांना अवघड असते.कधी कधी कधी तरी दिल्ली,  
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड,बिहार अश्या व अश्या अनेक राज्यात तेथील गुन्हेगारीप्रवृत्तीची टोळी फसवणूक करत
 असल्याचे उघड झाले आहे. मात्र या राज्यात गेल्यावर ज्याच्या मोबाईल वरून कॉल केला असतो त्यालाच याच माहिती
 नसते. म्हणजे त्याच्या सीम चा वापर करून गुन्हेगार फसवणूक करत असल्याचे निदर्शनात आले आहे. 
म्हणूनच नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


0 Comments: