काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी ९वा काव्यमहोत्सव

काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी ९वा काव्यमहोत्सव


 काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी ९वा काव्यमहोत्सव

-------------------------------------------

सोलापूर-  काव्यप्रेमी शिक्षक मंच या साहित्य संस्थेच्या वतीने वर्षातून दोन राज्यस्तरीय काव्यमहोत्सव आयोजित करण्यात येतात. यंदाचा दुसरा काव्यमहोत्सव ८ नोव्हेंबर २०२० रोजी "९वा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव" ऑनलाईन घेण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील ही एक पर्वणीच आहे.

         काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने वर्षभर साहित्य विषयक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल असते. साहित्यविषयक विविध प्रासंगिक उपक्रमांबरोबरच दैनंदिन, साप्ताहिक व मासिक उपक्रम घेऊन ही संस्था मराठी व अमराठी साहित्य क्षेत्रात योगदान देत आहे. केवळ चार वर्षांत या संस्थेने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आठ काव्यमहोत्सव घेतले असून आता कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर नववा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव ऑनलाईनच्या माध्यमातून घेत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, कोष्याध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी सांगितले आहे.

        सदर काव्यमहोत्सवात गझल मुशायरा, पदाधिकारी संमेलन, दिवाळी अंकाचे प्रकाशन, व्याख्यानासोबतच वेगवेगळे सत्र होणार आहेत. इच्छुकांनी सदर काव्यमहोत्सवाचे मुख्य संयोजक प्रमोद बाविस्कर- 98691 99499 किंवा सौ.जया नेरे- 9423918363 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री.विजय जोशी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (काव्यप्रेमी शिक्षक मंच)

यांनी दिली आहे.

0 Comments: