"ना भूतो,ना भविष्यती" असा शेतकरी मोर्चा

"ना भूतो,ना भविष्यती" असा शेतकरी मोर्चा

 "ना भूतो,ना भविष्यती" असा शेतकरी मोर्चा 





( लेखक : संतोष गोपाळ सावंत) 


           भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर जो विराट शेतकरी समुदाय पाहिलाय तो  शेतकऱ्यांचा हा मोर्चा म्हणजे "ना भूतो ना भविष्यती" असा हा मोर्चा आहे.

             खरच जर अन्नदाता देशात सुखी आणि सुरक्षित नसेल तर सरकारने नक्कीच गांभीर्याने यावर लवकरच विचार करण्याची गरज आहे, अनेक सरकारे आली अन गेली पण शेतकरी, कष्टकरी,प्रकल्प ग्रस्त तसा नेहमीच उपेक्षितच राहिला. निश्चित ध्येयधोरणे नसल्यामुळे शेतकऱ्याला मनाजोगे त्याला कधी न्यायचं मिळत नाही.  आज शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त यांच्यावरच अन्याय असे का होत राहतात, मुळात तर हा कष्टकरी हाच खरा आपला पाठीचा कणा आहे, अन्नदाता आहे. रात्रंदिवस शेतात राबवून अन्न पुरविणाऱ्या या शेतकऱ्यांना त्यांनाच त्यांच्या हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी सरकारला  जाग येण्याकरिता जर रात्रंदिवस जागून मोर्चा काढावे लागत आहे, तर याचा अर्थ काय? का कुठे सरकार कमी पडतंय याचा विचार सरकारने लवकर करणे गरजेचे आहे.

            खरच हा शेतकऱ्यांचा मोर्चा आता भविष्यातही ऐतिहासिक ठरणार आहे. असेच जर का होत राहिले तर भविष्यातही इतरही  छोटे मोठे व्यावसायिकही नोकरी धंदा बंद झालेले अथवा हाताला रोजगार नसलेली सर्व जनता उग्ररुप धारण करतील आणि जर अशीच रस्त्यावर उतरली तर खरंच सरकारला पळता भुई होईल! कारण कोरोनाच्या काळात सारी जनता त्रस्त झालेली आहेत, जर असेच चालत आले तर पुढील भविष्य ही अंधारमय होईल. त्याआधीच शासन प्रशासन मध्ये फार सुधारणा होणे गरजेची आहे, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त या समाजाला प्रथम न्याय देण्याची गरज आहे ,


 शेतकरी सुखी तर भारत सुखी 

आता तरी सरकारला सुबुद्धी यावी, तशी दक्षता घ्यावी.आणि कृषिप्रधान देश समणाऱ्या या भारत देशातील शेतकऱ्यांची यापुढे तरी अशी कधीच वाईट स्थिती येऊ नये, तशी शासन प्रशासनाने आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांच्या समस्यां वर योग्य तोडगा काढून तसे योग्य निर्णय घ्यावेत आणि न्याय मिळून द्यावा, एवढेच मी यावेळी सांगेन.

0 Comments: