क्षुल्लक कारणावरून तलवारीचा धाक दाखवत दोघांना बेदम मारहाण..
शेलार नाका येथील घटना
डोंबिवली ( शंकर जाधव ) क्षुल्लक कारणावरून चार ते पाच जनांनी दोघा तरुणांना तलवारीचा धाक दाखवत बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरातील शिवशंकर येथे घडली.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मारहाण करणाऱ्यांना अद्याप अटक झाली नसून पोलीस याचा कसून तपास करत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील शिवशंकर नगर परिसरातील योगेश एकनाथ अहिरे ( १७ ) याच्या फिर्यादीवरून डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी ८ तारखेला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास योगेश हा मित्र जावेद शेख याच्या बरोबर शेलार नाका येथे आले असता तिथे सुनील पवार हा दारू पिऊन उभा होता.सुनीलने या दोघांना काहीहि कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण केली.आपल्या मारहाण केल्याचे योगश आणि जावेदने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्या सांगितले. काही वेळाने योगेश व त्याचा मित्र जावेद आपल्या घरी जाण्यासाठी शेलार नाका येथे आल्यावर घराजवळ वाट पाहत उभे असलेले सुनील पवार तलवार घेऊन व साथीदार अजय डावरे व त्याच्या साथिदारांनी अडवले.माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केलीस ? याचा जाब विचारत त्याने बाचाबाची करण्यास सुरुवात केली.त्यानंतर सुनील सोबत आलेल्या साथदारांनी जावेदला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तर अजय डावरे याने योगेशला मारहाण केली.आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून जावेद याची आईने जावेदला वाचवण्याचा प्रयत्न केला. या तिची झटापटीत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून पडून गहाळ झाली. मारामारी होत असल्याचा आवाज ऐकल्यावर आजुबाजुकडील लोक जमा झाल्याने गर्दी झाली.तरीही सुनीलने तलवारीचा धाक दाखवून योगेशला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.




0 Comments: