कल्याण -डोंबिवली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने  रक्तदान शिबीर....

कल्याण -डोंबिवली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबीर....

 कल्याण -डोंबिवली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने  रक्तदान शिबीर....



     डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात राज्यात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे यांनी जिल्हा व ब्लॉक कमिटीला १ ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत कल्याण व डोंबिवली येथे महिनाभर रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.यानुसार जिल्हा कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालय लोढा हेवेन,निलजे (डोंबिवली पूर्व) येथे रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते.पालवालोढा हेवननिळजे आणि देसाई गावच्या लोकांनी शिबिरात रक्तदान केले.कल्याण जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटेजिल्हा कॉंग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष  सलीम शेखजिल्हा सेवादल अध्यक्ष  लाल चंद तिवारीजिल्हा अनुसूचित कास्ट अध्यक्ष सुरेंद्र आढावमाजी सेवादल अध्यक्ष पोली जॅकबकल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील शेखडोंबिवली पश्चिम ए ब्लॉक अध्यक्ष शशिकांत चौधरी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गायत्री सेनअल्पसंख्यांक उपाध्यक्ष शिबू शेखअल्पसंख्यांक ब्लॉक अध्यक्ष सुशील प्रसाद आदी शिबिरात उपस्थित होते.कल्याण जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजक जिल्हा उपाध्यक्ष  बिजू राजनजिल्हा उपाध्यक्ष अँटनी फिलिप व जिल्हा सरचिटणीस नेलन जॉय यांनी कोविड महामारीच्या कठीण प्रसंगी रक्तदान केल्याबद्दल लोकांचे आभार व्यक्त केले. जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष सचिन पोटेइतर पदाधिकारी व प्रेस क्लब पदाधिकारीयांनी रक्तदात्यांचे प्रमाणपत्र वाटप केले आहे.याशिबिरात १०० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या.जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्या पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील चिदानंद ब चॅरीटेबल ट्रस्ट ब्लड बँकेत देण्यात येणार आहेत.

0 Comments: