एमआयडीसीकडून  ऑनलाईन बिल पेमेंटवर अधिक शुल्क

एमआयडीसीकडून ऑनलाईन बिल पेमेंटवर अधिक शुल्क

 एमआयडीसीकडून  ऑनलाईन बिल पेमेंटवर अधिक शुल्क


[  सोशल मिडीयातून निषेध  ]

डोंबिवली ( शंकर जाधव )  एमआयडीसीने कोरोनामुळे लॉकडाऊन चालू झाल्यावर व त्यापूर्वीही पाण्याची बिले ऑनलाईन पेमेंटने भरावी अशी विनंती केली होती. त्यानुसार सर्वांनी यासाठी चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य केले. मात्र याचा त्रास ग्राहकांना झाला असून एमआयडीसीकडून पाणी बिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास रू.10/- अधिक शुल्क आकारले आहे. एमआयडीसीच्या या बेजाबदारपणाबद्दल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून सामाजिक माध्यमांद्वारे निषेध नोंदविला आहे.
      डोंबिवली औद्योगिक विभाग आणि निवासी विभागातील ग्राहकांनी एमआयडीसीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाण्याची बिले ऑनलाईन माध्यमातून भरली आहेत. यामुळे काऊंटरवर गर्दी टळली होती. महावितरण, केडीएमसी, महानगर गॅस इत्यादींकडून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांच्याकडून कुठलाही अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही उलट त्यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट केल्यास काही सवलत दिली जाते. सरकारतर्फे नेहमी ऑनलाईन पेमेंट करावे असे सांगितले जात आहे. पंतप्रधान व अर्थमंत्री यांनीही तसे आवाहन केले आहे. असे सर्व असताना मात्र एमआयडीसीकडून असे चुकीचे धोरण ग्राहकांवर लादले जात आहे. एमआयडीसी पाणी बिलाचा बाबतीतच असे ऑनलाईन जादा शुल्क आकारात नाही तर इतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पेमेंट असेल त्यालाही अधिक शुल्क आकारून करोडो रुपये ग्राहकांकडून वसूल करीत आहे. महाराष्ट्रातील एमआयडीसीच्या ग्राहकांना याचा फटका बसत आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील ग्राहकांनी याबद्दल सामाजिक माध्यमांद्वारे एमआयडीसी अधिकारी तसेच उधोगमंत्री सुभाष देसाई आणि सबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांना या विषयी नाराजी मेसेज पाठवून निषेध व्यक्त केल्याची माहिती सामोरे येत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, हा प्रश्न फक्त कल्याण-डोंबिवली पुरता नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा असून त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो.

0 Comments: