कविता :-  लागे ना मन माझे - (नरेश जाधव)

कविता :- लागे ना मन माझे - (नरेश जाधव)

 लागे ना मन माझे



लागे ना मन माझे आता कश्या मध्ये 

कोणी वसवली सृष्टी उजाड राना मध्ये ||धृ||


ह्या भावनांना सांगा जाऊन वसा कुठे हि 

एवढी ही उरली नाही जागा मना मध्ये  ||१||


सांगू कुणा व्यथा मी कोणास वेळ आहे 

जो तो अडकला आहे आपल्या व्यथा मध्ये ||२||


दाटलेल्या आसवांना द्या जरा वाट मोकळी 

वाहू द्या त्यांना ही आपल्या नैना मध्ये ||३||


गेले जे मज सोडुनी जे माझे आपुले होते 

आता ना येणे नरेश पुन्हा ह्या जीवना मध्ये ||४||



           - कवि नरेश गंगाराम जाधव.(भिवंडी)

मो.७५१७३८९७४६

0 Comments: