कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण, रुग्णसंख्या ५६,४५८
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात रविवारी १०३ नव्या रुग्णाची नोंद झाल्याने शहरातील एकूण रुग्णाची संख्या ५६,४५८ झाली. तर शनीवारी १३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यत ५४२२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. शनीवारी एक रुग्ण दगावल्याने करोना बळीचा आकडा १०८९ वर पोचला. सध्या ११४२ उपचाराधीन रुग्ण विविध रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहेत. रवीवारी सापडलेल्या रुग्णामध्ये कल्याण पूर्वेकडील ९, पश्चिमेकडे २९, डोंबिवली पूर्व ३८, पश्चिमेकडे १७, मांडा टिटवाळा ५, मोहना ५ असे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.




0 Comments: