केडीएमसी सुरक्षारक्षक शिवाजी खरे यांचा कोरोनाने मृत्यू
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक शिवाजी केदा खरे ( ५२ ) यांचा बुधवारी सकाळी कोरोनाने मृत्यू झाला.डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्यात पत्नी,दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.टिटवाळा येथील राहणारे खरे पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून १९९७ सालापासून कामास रुजू झाले.यापूर्वी पालिकेतील अनेक सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा झाली होती.खरे यांच्या निधनाने पालिका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





0 Comments: