कविता : काहीसं मनातले

कविता : काहीसं मनातले

काहीसं मनातले

 

माणुसकीचे झरे ते आटले.|

जग हे ह्रदयी जड का झाले?

कुठे शोधावा माणसातलं माणुस 

निसर्गात ही बदल ते झाले.

धरनी मातेचा झरा तो आटला 


        उजेडात ती रजनी झाली|

        आधांरातच का नाती विरली

         सगेसोयरे का दुर झाले.

        जिव्हाळयाचे  निरोप ना उरले 


अधांतरीचे नाते ते उरले|

पत्र लेखणीचे नाते तुटले 

मोबाईलशी नाते जुळले 

सरणावरती मेसेज ते आले 

     माणुसकीचे झरे ते आटले........


सौ प्रतिभा केदार पवार

0 Comments: