तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामुळे शिक्षकांवर  अन्याय

तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामुळे शिक्षकांवर अन्याय

 तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामुळे शिक्षकांवर  अन्याय



[ राज्य अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष ज. मो.अभ्यंकर यांचे प्रतिपादन ]


डोंबिवली : शिक्षण क्षेत्रातील समस्या वाढलेल्या आहेत. मागील पाच-सहा वर्षांच्या काळात समस्या वाढाव्यात अशा प्रकारचे जुलमी जीआर काढण्यात आले. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या काळात 150 जीआर काढले गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांवर त्या पाच वर्षांच्या काळात अन्याय झाला. आता राज्यशासनाला संधी मिळाली आहे पण कोरोनामुळे ती संधी साधता आली नाही. कोरोना नसता तर त्यावेळच्या जीआर मध्ये सुधारणा घडवून आणता आल्या असत्या असे वक्तव्य शिक्षकसेना प्रांताध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी डोंबिवलीत केले.


न्यू सनराइज इंग्लिश हायस्कूल भोपर रोड डोंबिवली पूर्वयेथे मुंबई विभाग, ठाणे, पालघर, रायगड, कोकण विभागाची शिक्षक समस्या, निराकरण व शिक्षक सेवा विस्तार पदाधिकारी नियुक्ती कार्यकम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यंकर बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर प्रा. जगदीश भगत, डॉ. किशोरी भगत, जेष्ठ नगरसेवक रमेश सुकाऱ्या म्हात्रे, कोकण प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, अजित चव्हाण, अरविंद नाईक, मंगेश पाटील, शिवाजी शेंडगे, चिंतामण वेखंडे, मुकेश शिरसाठ, नामदेव सोनावणे, मुरलीधर मोरे आदी उपस्थित होते.


यावेळी अभ्यंकर पुढे म्हणाले, २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना सेवा निवृत्ती वेतन मिळेल असा आमचा प्रयत्न निश्चित असेल. सेवा निवृत्तीचा विषयाला प्राधान्य असून तो आमच्या यादीवर प्रथम आहे. सेवा निवृत्तीवेतन मिळालेच पाहिजे असा आग्रह आहे. जर अडवणूक होत असेल तर दूर करण्यासाठी शिक्षकसेना निश्चित पुढे येईल. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी हा सेवानिवृत्त होणार असेल त्याच्या दोन वर्षे आधीपासून त्याचे पेन्शन पेपर तयार करावेत. शिक्षक संख्या मंजुरीचे धोरण बदलले पाहिजे. शाळा म्हणजे व्यापारी संकुल नाही. मुलाची प्रगती कारण हे शाळेच काम आहे. विद्यार्थ्यांना सगळ्या विषयाचे शिक्षक मिळाले पाहिजेत. शाळेमध्ये सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. माध्यमिक शिक्षण हे राज्यशासनाची जबाबदरी आहे प्रत्येक शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे त्यासाठी शिक्षकसेना काम करीत आहे.

पतीपत्नी एकत्रीकरण, अतिरिक्त समायोजन असे प्रश्न गंभीर आहेत. अनुदान आणि पेन्शन हे प्रश्न नक्कीच सुटतील. एक लाख पदे कमी आहेत नवीन जी.आर. मध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे.

यावेळी  प्रा. जगदीश भगत, डॉ. किशोरी भगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबईत अधिवेशन घेण्यावर चर्चा करण्यात आली.

0 Comments: