शिवसेना मंत्री अधिकाऱ्यांना साथ देत स्वतःचे दुकान चालवत आहे - प्रदीप पेशकार
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत एका कार्यक्रमात भाजप प्रदेश अध्यक्ष औद्योगिक सेलचे प्रदीप पेशकार थेट शिवसेनेच्या मंत्र्यांवर जोरदार टीका करत प्रदूषणाचा बागुलबुवा दाखवून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी उद्योगांना अडचणीत आणण्याचे काम असल्याचे सांगितले. शिवसेनेचे मंत्री देखील अधिकाऱ्यांना साथ देत असून स्वतःचे दुकान चालवत आहेत.त्यामुळे अधिकाऱ्यांनी उद्योगाला अडचणीत आणण्याचे धंदे सोडून द्यावे असेहि पेशकार यांनी सांगितले.
भाजप उद्योग आघाडी पदांचा विस्तार कामा संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयमा एमएसएमइ अध्यक्ष अविनाश दलाल, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू पर, महिला ग्रामीण मंडळ अध्यक्ष मनीषा राणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, भाजप उद्योग आघाडी सह संयोजक जयेश बारोट,भाजप उद्योग आघाडी संयोजक आणि कामा अध्यक्ष देवेन सोनी, सूत्रसंचालक बाबजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष औद्योगिक सेलचे प्रदीप पेशकार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर उद्योजकांना साथ द्या असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, जास्तीत जास्त तरुणांनी उद्योग करावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीची स्थापना करण्यात आली आली असून प्रत्येक जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत टास्क फोर्स बनवण्याचे काम सुरू असल्याचे पेशकार यांनी सांगितले. उद्योगांना किंवा उद्योजकांना आलेले प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.भारतीय जनता पक्ष उद्योजकांना मदत करण्याच्या भूमिकेत असून कुठलीही अडचण आली तरी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतो.प्रदूषण झाले तर मार्ग काय काढावा याचा विचार करावा असे सांगतानाच उद्योग बंद करावे हे भाजपला मान्य नाही असे वक्तव्य भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले. तर नंदू परब यांनी उद्योगांमुळे तरुणांना रोजगार मिळेल त्यामुळे उद्योजकांना चालना द्या असे नमूद केले. तर कामाचे अध्यक्ष आणि भाजप उद्योग सेलचे संयोजक देवेन सोनी यांनी स्थानिक नागरिकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळाला तर रेल्वेची गर्दी देखील कमी होईल.त्यामुळे रेल्वेच्या अपघातात घट होईल असे सांगितले. या विस्तार कार्यक्रमात कामाच्या २२ सदस्यांना विविध पदाची जबाबदारी देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबजी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी भाजप कल्याण जिल्हा उद्योग आघाडी सदस्य कमल कपूर यांनी सांभाळली.





0 Comments: