कविता : जानता ना आले
दु:ख मनातले वेधता ना आले
फुले आसवांची,वेंचता ना आले ||धृ||
तु केला रे प्रयत्न व्यक्त होण्याचा
मज मनातील जाणता ना आले ||१||
केला प्रवास सुरू,मी जिवनाचा
मागे वळून पुन्हा,पाहता ना आले ||२||
वाट द्या थोडी,मोकळी आसवांना
फुटला हा बांध,रोखता ना आले ||३||
आहे सोबती का,घडी दो घडीचा
नरेशा मजला सांगता ना आले ||४||
- कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो. ७५१७३८९७४६




0 Comments: