`भारत बंद’ ला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता

`भारत बंद’ ला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता

 `भारत बंद’ ला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता


डोंबिवली ( शंकर जाधव ) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी भारत बंदला डोंबिवलीतून काही राजकीय पक्षांचा व संघटनांचा पाठींबा मिळाला असला तरी येथील हॉटेल आणि दुकानदारांनी बंद मध्ये सामील न होण्याची तयारी दर्शविली आहे. दुकाने आणि हॉटेल सुरु राहणार आहे. त्यामुळे `भारत बंद’ ला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने केंद्र सरकार विरोधात उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंद मध्ये सत्ताधारी शिवसेनाराष्ट्रवादी आणि कॉंग्रेस तसेच बसपा पक्षांनी पाठींबा दिला असून ते बंद मध्ये सामील होणार आहे.डोंबिवली शहरातील शहरातील लालबावटा रिक्षा संघटनारिक्षा चालक मालक युनियन डोंबिवली संघटनांनी सहभाग घेतला आहे. अन्नदात्या बळीराजा सोबत आम्ही आहोत असे रिक्षा चालक मालक युनियन डोंबिवलीचे अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे यांनी सांगितले. डोंबिवली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी सांगितले कि दुकाने बंद राहणार नाहीत, आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही. तर हॉटेल्स ओनर असोसिशनचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनीही हॉटेल्स सुरु राहणार असून भारत बंद मध्ये सहभाग नाही असे सांगितले. सिनेमागृह संघटनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याने काही निश्चित भूमिका नाही असे मधुबन सिनेमागृहाचे मालक मनीष वीरा यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील सिनेमागृहदुकाने व हॉटेल्स सरू राहणार असल्याने डोंबिवली बंद होणार का हे मंगळवारीच समजणार आहे. भारत बंद दरम्यान मंगळवारी कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार बंद राहणर त्यामुळे घाऊक व्यापारी बंद सहभागी होणार असल्याने किरकोळ विक्रेत्यांना भाजी व फळे उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे नागरिकांना भाजी व फळे मिळणार नाहीत. सोमवारी संध्याकाळी डोंबिवलीत लालबावटा रिक्षा युनियन कार्यकर्ते बंदबाबत कॉर्नर सभा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत

                      

 

0 Comments: