कॉंग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर आणखी एका महिना सुरु

कॉंग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर आणखी एका महिना सुरु

 कॉंग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर आणखी एका महिना सुरु

 डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र राज्य सरकारच्या अवाहानानुसार राज्यात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी कल्याण-डोंबिवली जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे यांनी जिल्हा कमिटी आणि ब्लॉक कमिटीला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यास सांगितले आहे.तीन रक्तदान शिबीर पार पडले असून चौथे रक्तदान शिबीर शनिवार पाच डिसेबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत कल्याण पश्चिम येथील वल्लीपार रोड, बैलबाजार,सालीम शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केले आहे.रक्त दान करण्यासाठी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा सलीम अध्यक्ष शेख ९३२६७५८२३४ वर संपर्क साधावा.     

0 Comments: